न्यू इअरसाठी दहा दिवस आधीच रायगडातील हॉटेल्सचे बुकिंग फुल्ल, दर दुपटीने वाढले; व्यावसायिकांना सुगीचे दिवस

न्यू इअरसाठी दहा दिवस आधीच रायगडातील हॉटेल्सचे बुकिंग फुल्ल, दर दुपटीने वाढले; व्यावसायिकांना सुगीचे दिवस

सरत्या वर्षाला बायबाय करतानाच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी रायगडातील निसर्गरम्य किनारे गाठण्याचे बेत आखले आहेत. यासाठी गेल्या आठवड्यापासूनच हॉटेल, होम स्टे तसेच खासगी बंगल्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली असून दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे दहा दिवस आधीच रायगडातील हॉटेल, रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल झाले आहे. यामुळे व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. दरम्यान, 25 डिसेंबर नाताळपासूनच 31 डिसेंबरपर्यंत पर्यटकांची ओव्हरपॅक गर्दी होणार असल्याने अलिबाग, मुरुड, उरणमधील किनाऱ्यांवर पोलिसांनी वॉच ठेवण्यासाठी पथके तयार आहेत.

मुंबई, ठाणे तसेच पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पर्यटक रायगडातील समुद्रकिनाऱ्यांना पहिली पसंती देतात. त्यामुळे दरवर्षी दिवाळी, उन्हाळी सुट्टया, नाताळ, थर्टीफर्स्टला मुरुड, अलिबाग, काशिद, श्रीवर्धन तसेच उरणमधील किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. यावर्षीदेखील दहा दिवस अगोदरच हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टेसाठी आगाऊ बुकिंग करण्यात आल्याने सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे. एरवी हजार, बाराशेपासून असणारे रूम भाडे आता थेट दोन हजारांपासून दहा हजारांवर गेले असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगडातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये विद्युत रोषणाईचा सध्या झगमगाट दिसून येत आहे.
जिल्ह्यात सुमारे तीन लाख पर्यटक दाखल होतील असा अंदाज असून हॉटेल, कॉटेज, लॉजव्यतिरिक्त इतर व्यवसाय तेजीत येणार आहेत.
न्यू इअर सेलिब्रेशनसाठी रायगडातील हॉटेल तसेच रिसॉर्टमध्ये ऑर्केस्ट्रा, डिजे नाईट, डान्सचे आयोजन केले आहे.

नाताळ व स्वागतासाठी पर्यटकांनी आगाऊ चाळ व नववर्ष स्वागताला त्यामुळे कॉटेज फुल झाले आहे. सध्या कॉटेजची सजावट करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करीत आहोत. तसेच पर्यटकांना येथील खाद्यसंस्कृतीचा परिचय देण्यासाठी केवळ रायगडचे खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहेत.
■ प्रभाकर पाटील, कॉटेज मालक.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास...
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल