दानपेटीत चुकून पडलेला आयफोन देण्यास नकार
मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताला वेगळाच अनुभव आला. चुकून खिशातील महागडा आयफोन मंदिराच्या दानपेटीत पडला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने मंदिर प्रशासनाला याची माहिती दिली. परंतु, दानपेटीत पडलेला मोबाईल आता देवाचा झाला आहे, असे सांगत मंदिर प्रशाननाने आयफोन देण्यास नकार दिला. या भक्ताला फक्त आयफोनमधील सिमकार्ड काढून हवाली केले. चेन्नईतील थिरुपुरुरच्या अरुल्मिगु कंदस्वामी मंदिरातील ही घटना घडली आहे. या भक्ताचे नाव दिनेश असून तो विनायगपूरमधील रहिवाशी आहे. कुटुंबासह मंदिरात गेला होता. देवाची पूजा केल्यानंतर त्याने हुंडी म्हणजे दानपेटीत काही पैसे टाकायला गेला. तेव्हा आयफोन चुकून दानपेटीत पडला. ही हुंडी म्हणजे दक्षिणेकडील मंदिरांमध्ये असणारी दानपेटी बरीच उंचावर असून त्यावर लोखंडी जाळी सुद्धा होती.
आयफोन आता देवाचा
फोन बाहेर काढणे अशक्य दिसताच दिनेशने तातडीने मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला. परंतु, तिथं समाधानकारक उत्तर मिळालं नाही. जी वस्तू दानपेटीमध्ये टाकली जाते ती देवाचीच होऊन जाते. ती परत केली जात नाही. परंपरेनुसार हुंडी दोन महिन्यांतून एकदाच उघडली जाते, असेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दिनेशने धार्मिक संस्थेच्या अधिकाऱयांकडे याची तक्रार केली. तेव्हा दानपेटी कधी उघडणार हे सांगितले. हुंडी उघडण्यात आल्यानंतर मंदिर प्रशासनाने तो आयफोन आता मंदिराची संपत्ती असल्याचे सांगितले. फोन देण्याऐवजी सिम कार्ड आणि फोनमधील महत्त्वाचा डेटा डाऊनलोड करण्याचा पर्याय दिनेशला दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List