मुंबई गोवा महामार्गावर खाजगी प्रवासी बसला भीषण आग, सर्व 34 प्रवासी सुदैवाने बचावले
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे मध्यरात्री बाराच्या सुमारास एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना उघडली आहे. बसमध्ये चालक आणि क्लिनरसह 34 प्रवासी होते. अपघातात सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र बसमध्ये असलेले प्रवाशांचे सर्व सामान जळाले आहे. खापरोबा ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरीहून मालवणकडे जात होती. बस कोलाड रेल्वे पुलाजवळ येताच बसच्या मागून मोठा आवाज आला.
चालकाला मोठा आवाज येताच त्याने तात्काळ बस थांबवली. खाली उतरल्यावर बसच्या मागील भागाला आग लागल्याचे त्याला दिसले. यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. सुदैवाने सर्व प्रवाशी बसमधून खाली उतरल्यानंतर बसने पेट घेतला. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List