उठसूट मशि‍दीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? सरसंघचालकांनी टोचले कान

उठसूट मशि‍दीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? सरसंघचालकांनी टोचले कान

सध्या उत्तर प्रदेशातील संभलचा मुद्दा देशभरात गाजत आहे. तेथील एका मशीदीच्या परिसारतील विहीरीत काही मूर्ती सापडल्या आहेत. कुठे ना कुठे एखाद्या मशिदीखालून किंवा दर्ग्याच्याखालून मूर्ती सापडत आहेत. त्यानंतर लगेचच काही हिंदू नेते त्या मशीद किंवा दर्ग्याचे उत्खनन करून घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यावर न्यायालयही ऑर्डर देतं. यानंतर विहिरींमध्ये मंदिराचा ढिगारा किंवा मूर्ती पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. अशा घटनांमुळे वातावरण बिघडतं. सध्या उत्तर प्रदेशात सध्या असंच वातावरण आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान करत चांगलेच कान टोचले आहेत.

अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करत शांतता प्रस्थापित करत परिस्थितीवर अंकुश ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे. मात्र, ते बघ्याची भूमिका घेत गप्प असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. उठसूट मशि‍दीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? काही हिंदू नेत्यांच्या अशा कृतीने देशाची बदनामी होत असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. काही स्वयंघोषित हिंदूंनी अनावश्यक हिंदू-मुस्लिम संघर्ष निर्माण करणे टाळावे. हिंदू परंपरेने उदार आणि सहिष्णू आहेत. आपल्या या परंपरेला धक्का पोहोचेल असा कोणताही वाद निर्माण करणं आपण आता टाळलं पाहिजे, असे ते म्हणाले. जगभरात हिंदूंना आपली सद्भावनेची प्रतिमा कायम ठेवली पाहिजे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केलं आहे..

आता राममंदिराची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आता मंदिर-मशिदीवरून कोणताही वाद उभा करण्याची गरज नाही. आपण एकत्र , एकदिलाने राहू शकतो, हे देशाने दाखवून देण्याची वेळ आहे. अलीकडे अनेक मशिदींखाली मंदिरांचे अवशेष सापडल्याचे म्हटले जात आहे, त्यासाठी काही लोक न्यायालयातही जातात. ते न्यायालयातही याचिका दाखल करतात. पण असे करणे अस्वीकार्य असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
नाताळच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी कोकण आणि गोव्कयाडे रवाना झाले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावमध्ये सुमारे 10 किमीपर्यंत...
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं