हवालदाराच्या घरात सापडलं कोटय़वधींचं घबाड; 2.95 कोटींची रोकड, 10 किलो चांदीचे दागिने, दोन आलिशान कार

हवालदाराच्या घरात सापडलं कोटय़वधींचं घबाड; 2.95 कोटींची रोकड, 10 किलो चांदीचे दागिने, दोन आलिशान कार

भोपाळमध्ये लोकायुक्त आणि आयकर विभागाने अवघी 7 वर्षांची नोकरी करून राजीनामा देणाऱया वाहतूक हवालदार सौरभ शर्माच्या घरात झाडाझडती घेतल्यानंतर कोटय़वधी रुपयांचे घबाड सापडले आहे. 3 कोटी रुपये रोख रक्कम, 2 कोटी रुपये किंमतीचे दोन क्विंटल चांदीचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने, 50 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, दोन आलिशान कार, नोटा मोजण्याच्या 7 मशीन याचा समावेश आहे. नोकरी मिळाल्यापासून राजीनामा देण्यापर्यंतच्या संपूर्ण कथेत सरकारची त्याच्यावर खूप मेहरबानी असल्याचे समोर आले. सात वर्षांच्या नोकरीत तो कोटय़धीश झाला होता. तो हवालदार असला तरी मंत्री आणि अधिकाऱयांचा तो सर्वात लाडका होता. यातून त्याने कोटय़वधी रुपयांची माया जमवली. सौरभ शर्माकडे मध्य प्रदेशच्या निम्म्या वाहतूक चेकपोस्टची जबाबदारी होती. या चेकपोस्टमध्ये येणाऱया सर्व रोख रकमेचा तो स्वतः व्यवहार करत असे. चेकपोस्टवर तैनात असलेल्या इन्स्पेक्टर आणि इतर अधिकाऱयांचा ‘हिस्सा’ तोच ठरवायचा. त्याच्या कामात कोणताही अधिकारी किंवा निरीक्षक ढवळाढवळ करत नव्हता इतकी त्याची पॉवर वाढली होती.

चेकपोस्टचे कंत्राट स्वतःकडे ठेवले

सौरभने सरकारी चेकपोस्टचे खासगीकरण केलेत्याने हे चेकपोस्ट कंत्राटावर दिले होते. प्रत्येक चेकपोस्टवरून प्रत्येक दिवसासाठी ठराविक रक्कम ठरवलेली होती. हे पैसे तो स्वतः चेकपोस्टवरून घेत असे. 1 जुलै 2024 पूर्वी, मध्य प्रदेशात एकूण 47 वाहतूक चेकपोस्ट होत्या, त्यापैकी सौरभ 23 हाताळत होता. चेकपोस्टवरून पैसे गोळा करून वाटप करायचा. ही रक्कम सौरभ स्वतः चेकपोस्टवरून ठरलेल्या ठिकाणी पोहोचवत असायचा.

दुबईला पळून जाण्यासाठी राजीनामा

आपण केलेल्या भ्रष्टाचारामुळे अटक होऊ शकते, याची कुणकुण सौरभला लागली होती. त्यामुळे त्याने तपास सुरू होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. एखाद्या व्यक्तीची चौकशी सुरू असल्यास त्याचा राजीनामा स्वीकारला जात नाही, असे असतानाही त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आला. सौरभने राजीनामा दिल्यानंतर 3 महिन्यांचा नोटीस कालावधीसुद्धा पूर्ण केला नाही. सौरभ सध्या दुबईला पळून गेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’ कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
कल्याण पश्चिमेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण...
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल
मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता
अल्लू अर्जुन अखेर संतापला; गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशारा; म्हणाला “असं करणं थांबवलं नाहीतर…”
फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता