देशात संविधानाचे रक्षण कोण करणार, सर्व संस्था भाजपने ताब्यात घेतल्यात; राहुल गांधी यांचा हल्लाबोल
आता देशात संविधान रक्षणाची लढाई सुरू आहे. भाजपने संविधानाला ठेच पोहचवणाऱ्या अनेक कुरघोडी केल्या आहेत. संविधान बदलाचे त्यांचे मनसुबे आता जनतेसमोर आले आहेत. देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला धोका आहे. संविधान रक्षणाची जबाबदारी असलेल्या संस्था आज संविधानाचे रक्षण करताना दिसत नाहीत. भाजपने सर्व संस्थावर कब्जा केला आहे आणि त्या संस्था भाजपच्या नियंत्रणात आहेत, त्यामुळे ते त्यांचे संविधान रक्षणाचे कार्य करून शकत नाहीत, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्सवर याबाबतचा राहुल गांधी यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात राहुल गांधी म्हणत आहेत की,आज देशात कोणती संस्था संविधान रक्षणाचे कार्य करत आहे. पत्रकार हे लोकशाहीचा एक स्तंभ आहेत. संविधान रक्षणाची जबाबदारी त्यांचीही आहे. मात्र, आज ते संविधान रक्षणाचे कार्य करत आहेत काय? तर उत्तर नाही, असे येते. केंद्रीय निवडणूक आयोग संविधानाचे रक्षण करत आहे काय? याचेही उत्तर नाही असेच येते. सीबीआय, ईडी, आयकर विभाग हे संविधानाचे रक्षण करतात काय? याचेही उत्तर नाही, असेच आहे. प्रशासकीय यंत्रणा संविधानाचे रक्षण करतात काय, नाही, असेच उत्तर आहे.
या सर्व संस्थावर भाजपने कब्जा मिळवला आहे. या सर्व संस्थावर भाजपने नियंत्रण मिळवले आहे. अशा परिस्थितीत संविधानचे संरक्षण कोण करणार असा सावला उपस्थित होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडी संविधान रक्षणासाठी ठामपणे उभी असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List