दिल्लीतील तीन शाळांना विद्यार्थ्यांकडूनच बॉम्बने उडविण्याची धमकी, कारण जाणून धक्का बसेल
दिल्लीत मागच्या काही दिवसांपासून शाळांना ईमेलच्या माध्यमातून बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन शाळांना त्याच शाळेतील विद्यार्थ्यांकडून धमकी देण्यात आल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या शाळांपैकी एक व्यंकटेश्वर ग्लोबल शाळेचा समावेश होता. ज्यामध्ये 28 नोव्हेंबर रोजी रोहिणी प्रशांत विहार पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये झालेल्या स्फोटाच्या एक दिवसापूर्वी धमकीचा ईमेल आला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा ईमेल शाळेत शिकणाऱ्या भाऊ -बहिणींनी पाठवला आहे कारण त्यांना परीक्षा पुढे ढकलण्याची इच्छा होती. अधिकाऱ्याने सांगितले की, समुपदेशनादरम्यान, दोन्ही विद्यार्थ्यांनी खुलासा केला की त्यांना ही कल्पना यापूर्वी शाळांना बॉम्बच्या धमक्यांच्या बातम्यांवरुन सूचली होती. त्यांच्या पालकांना ताकीद दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
त्याचप्रमाणे आणखी एका पोलीस अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, रोहिणी आणि पश्चिम विहार येथील आणखी दोन शाळांच्या विद्यार्थ्यांनीच धमकीचे ईमेल पाठवले होते. शाळा बंदच राहावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा होती. गेल्या 11 दिवसांत बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीतील 100 हून अधिक शाळांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कसून तपास केला असता ईमेल व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) द्वारे पाठवले गेले होते, ज्यामुळे त्यांना गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण होते. या वर्षी मे महिन्यापासून बॉम्बच्या धमकीच्या 50 हून अधिक ईमेलने केवळ शाळांमध्येच नाही तर दिल्लीतील रुग्णालये, विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List