Bihar Mob Lynching – बिहारमध्ये माणुसकीला काळीमा! क्रूरतेचे चित्रीकरण करुन केले व्हायरल
बिहारच्या मुजफ्फर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. येथे एका युवकाला मारहाण करुन नंतर त्याला थुंकी चाटण्यास जबरदस्ती करण्यात आली. एवढ्यावरचं ते नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. तरुणाच्या आईने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एमएसकेबी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 16 डिसेंबर ही घटना घडली. नवाब हसन असे पीडित मुलाचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर पीडित मुलाच्या आईने या घटनेबाबत पोलिसात तक्रार केली. माझा मुलगा घराबाहेर कामासाठी गेला होता. आरोपींनी त्याला गाठले आणि त्याला लाथा मारून मारहाण केली. यानंतर आरोपींनी त्याला थुंकीही चाटायला लावली. एका आरोपीने चाकू दाखवून 15 दिवसांत तुझी हत्या करू, असे सांगितले. त्यांच्या खिशातील दोन हजार रुपयेही हिसकावले. मारहाण करणाऱ्या तरुणाने त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला, तेव्हाच आम्हाली याची माहिती मिळाली, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल असे पोलीस अधिकारी सरत कुमार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List