लग्न सोहळ्यानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र, उद्धव ठाकरेंनी नवदाम्पत्याला दिले आशीर्वाद
मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावत वधू आणि वराला आशीर्वाद दिले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
याच लग्न सोहळ्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या शेजारी उभे असल्याचं दिसत आहे. तसेच ते वधू आणि वरावर अक्षता टाकताना दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List