रोखठोक – आम्ही कसे हरलो?

रोखठोक – आम्ही कसे हरलो?

विधानसभेचे महाराष्ट्रातील निकाल रहस्यमय आहेत. लोकसभेनंतर मतदानाचा पॅटर्न असा बदलला की निकालाची दिशाच फिरली. जमिनीवरचे चित्र पूर्ण वेगळे होते. तरीही निकालात ते आढळले नाही. निकालानंतर एक तातडीचे सर्वेक्षण एका प्रतिष्ठित संस्थेने केले. त्यातून बाहेर आलेले सत्य चक्रावणारे आहे. कोणतेही कारण नसताना आम्ही कसे हरलो?

विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल 14 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापनेस इतका कालावधी का लागला? हे रहस्य आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे हे शेवटपर्यंत रुसून बसले, पण भाजपपुढे त्यांचे काहीच चालले नाही. आझाद मैदानावर नवे सरकार शपथ घेत असताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपचा अनपेक्षित विजय व ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध आंदोलने सुरू होती. राज्यातल्या निवडणूक निकालांवर विश्वास बसत नसल्याने ‘बालेट पेपर’वर पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून व्हावी हे चिंताजनक आहे. सोलापूरच्या मारकडवाडीत 144 कलम लावून मतदान बंद पाडावे लागले. त्याची दखल देशाने घेतली. बाबा आढाव हे लोकशाही वाचविण्यासाठी उपोषणास बसले. महाराष्ट्रातील विजयाचे श्रेय श्री. फडणवीस यांना दिले जात आहे, पण हा विजय खोटा, बनावट असल्याचे सांगत राज्यभरातून अनेकांनी न्यायालये आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला, पण पुढच्या चार महिन्यांत भाजप विक्रमी बहुमताने जिंकला. निवडणूकपूर्व सर्व चाचण्यांत विधानसभेत महाविकास आघाडीच जिंकेल असे चित्र होते. निदान विजयासाठी काटय़ाची टक्कर होईल अशीच हवा होती. पण काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना मिळून एकत्रित पन्नास जागाही मिळाल्या नाहीत हे कुणालाच पटणार नाही. हे का घडले याची कारणे दिली जात आहेत. त्यात धर्मांध प्रचार, पैशाचा वापर, संध्याकाळी पाचनंतर अचानक वाढवलेली मतांची टक्केवारी, 76 लाख मते वाढवली व फडणवीसांचे सरकार राज्यात विराजमान झाले.

जनतेला प्रश्न

महाराष्ट्रात इतके विचित्र निकाल का व कसे लागले? चार तासांत 76 लाख मते संशयास्पदरीत्या वाढल्याचे समर्थन करणारे खुलासे भाजप गोटातून होत आहेत. मी येथे संशोधन व आकडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निकालाचे खरे-खोटेपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. धक्कादायक निकाल लागताच महाराष्ट्रात एक तातडीचे सर्वेक्षण करण्यात आले. लोकांशी थेट संवाद साधून झालेल्या मतदानाविषयी त्यांचे मत समजून घेतले. त्यातून जे सत्य बाहेर आले ते चमत्कारिक आहे.

लोकांना प्रश्न विचारले.

या वेळी आपण महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय पक्षाला मतदान केले?

त्याचे उत्तर असे –

निवडणूक निकालानंतरच्या सर्वेक्षणात साधारणतः असे दिसते 2.6 टक्के लोकांनी आपण कोणाला मत दिले हे सांगण्यास नकार दिला.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत तुम्ही कोणत्या आघाडीस मतदान केले?

उत्तर

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार पोस्टल बालेटमध्ये कोणता पक्ष पुढे होता व प्रत्यक्ष ईव्हीएम मोजणीत कोण जिंकले हे आकडेदेखील महत्त्वाचे आहेत.

महायुती      पोस्टल बालेट   ईव्हीएम निकाल

भाजप               84                 132

शिंदे                 29                  57

अजित पवार        24                  41

रासपा               1                     1

जनसुराज्य           2                   2

रा. स्वाभिमान        1                  1

महायुती      141             234

महाविकास  आघाडी    पोस्टल बालेट     ईव्हीएम

काँग्रेस                       56               16

उद्धव ठाकरे                37               20

शरद पवार                  40               10

समाजवादी                  1                  2

सीपीएम                     2                  1

शे.का.प.                   1                  1

मविआ                   137             50

पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम निकालात कमालीचे अंतर आहे. पोस्टल बॅलेटप्रमाणे महायुती 141 विधानसभा जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी 137 जागांवर पुढे. इतर काहीजण 10 विधानसभा जागांवर आघाडीवर. याचा अर्थ असा की, महायुती व महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होती व त्यात महायुती 3-4 जागांनी पुढे होती. पण ईव्हीएम निकालांनी भाजपसह महायुतीला एकतर्फी विजय मिळवून दिला. हे शक्यच वाटत नाही.

लोकसभेचा पॅटर्न

‘लोकसभा – 2024’ च्या निकालासंदर्भात येथे चर्चा करणे गरजेचे आहे. चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पोस्टल व ईव्हीएममध्ये काय घडले?

एनडीए  पोस्टल बॅलेट(लोकसभा)       ईव्हीएम

भाजप               12                         9

शिंदे                 6                         7

अजित पवार          0                        1

एनडीए        18 जागा                      17

महाविकास आघाडी पोस्टल     ईव्हीएम

काँग्रेस                    11         13

उद्धव ठाकरे              13       10   (मुंबई उत्तरची जागा जिंकली ती 48 मतांनी चोरली.)

शरद पवार               6           8

मविआ              30        31 (एक अपक्ष)

2024 च्या लोकसभा निकालांत प्रत्यक्ष ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेटमध्ये सारखाच पॅटर्न आणि ट्रेण्ड दिसतो. पण त्याच वेळी विधानसभा निकालाच्या ईव्हीएम आणि पोस्टल मतांत प्रचंड तफावत दिसते. हा मोठा झोल आहे.

आकडे असे बदलले

महाराष्ट्रात 5 कोटी 71 लाख मतदारांनी 2024 च्या लोकसभेसाठी मतदान केले. त्याच वेळी त्याच महाराष्ट्रात 6 कोटी 45 लाख मतदारांनी विधानसभेत मतदान केले. साधारण 74 लाख जादा मतदारांनी विधानसभेत मतदान केले. लोकसभेच्या तुलनेत हे 74 लाख वाढीव मतदान संशयास्पद आहे. याच वाढीव मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाची दिशाच बदलून टाकली.

निवडणूक निकालानंतरच्या सर्वेक्षणात मतदारांना महत्त्वाचा प्रश्न विचारला.

आपण ज्या आघाडीला किंवा उमेदवारास मतदान केले तो पक्ष किंवा उमेदवार तुमच्या मतदारसंघात जिंकला काय?

अनेक विभागांत, अनेक लोकांना निकालाचे आश्चर्य व रहस्यच वाटत आहे. जे उमेदवार प्रचंड मताधिक्यात जिंकायला हवे ते पराभूत झाले व जे जिंकूच शकत नव्हते ते दणदणीत जिंकले.

महाराष्ट्र विधानसभेसाठी तुम्ही मतदान केले काय?

सत्य असे आहे की, मतदानाची टक्केवारी या वेळी प्रत्यक्षात घटली आहे. पण मतदान वाढल्याचे आकडे फुगवून, डंका वाजवून सांगितले गेले. मतदानाची टक्केवारी साधारण 60 टक्क्यांच्या आसपास आहे. पण मतदान वाढल्याची बोंब ठोकण्यात आली.

नावे वगळली; कशी?

विधानसभा निकालानंतरच्या सर्व्हेत (Post Results Survey) 5.8 टक्के लोक असे आढळले की, त्यांनी तक्रार केली. त्यांनी लोकसभेत मतदान केले, पण विधानसभा निवडणुकीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. हे धक्कादायक आहे.

लोकांना प्रश्न विचारले –

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत इतके प्रचंड बहुमत मिळेल असे वाटले होते काय?

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला इतके प्रचंड यश मिळाले असे वाटते का?

महायुतीस पाठिंबा देणाऱ्या 10.9 टक्के मतदारांनी सांगितले की, ‘महायुतीस इतके मोठे यश मिळेल (Land slide majority) असे वातावरण प्रत्यक्ष जमिनीवर नव्हते. हे कसे घडले ते आश्चर्य आहे. ज्यांनी महायुती व महाविकास आघाडीला मतदान केले नाही अशा 6.8 टक्के मतदारांचेदेखील हेच मत आहे. लढत तर अटीतटीची होती. मग हे कसे घडले? हा प्रश्न सगळ्याच्याच चेहऱ्यावर आहे. मुख्यमंत्री  पदासाठी सर्वात जास्त पसंती उद्धव ठाकरे (28.4 टक्के) यांना, त्यानंतर एकनाथ शिंदे (23.6 टक्के) तर देवेंद्र फडणवीस (11.4 टक्के) बाकी इतर 1 ते 2 टक्क्यांचे धनी. तरीही आज फडणवीस मोठ्या विजयाचे शिल्पकार म्हणून शपथ घेताना पाहिले. जनमत पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. सामान्य जनतेला उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदी बसलेले पाहायचे होते. मग त्यांनी महाविकास आघाडीला मतदान का केले नाही? असे करण्यामागचे कोणतेच कारण दिसत नाही. पण हे घडले आहे.

ग्रामीण महाराष्ट्रात

निवडणूक निकालानंतरचा ग्रामीण भागातील झालेला मतदानाचा ‘पॅटर्न’ रंजक आहे. लोकांनी कोणत्या आघाडीला मतदान केले? त्याचे उत्तर
पहा –

ग्रामीण भागात महायुती व महाविकास आघाडीत 6.4 टक्क्यांचा फरक आहे. महाविकास आघाडीकडे मतदानांचा उघड कल आहे. पण हा मतांचा फरक प्रत्यक्ष निकालात दिसला नाही हे रहस्य आहे. ग्रामीण मतदार म्हणतोय, निवडणूक निकालात घोटाळा झालाय. आपण हे असे मतदान केलेच नाही. मतदानाच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे स्पष्ट दिसते. या सर्व पार्श्वभूमीवर 2019 च्या विधानसभेच्या पोस्टल बॅलेट व ईव्हीएम निकालाची आकडेवारी पाहणे गरजेचे आहे.

2019 ला काय घडले?

पोस्टल बॅलेट      ईव्हीएम   निकाल

भाजप             101           105

शिवसेना            56             56

राष्ट्रवादी            60             54

काँग्रेस               45             44

एमआयएम         1               2

सपा                    0               2

मनसे                   1               1

प्रहार                  1               2

बविआ                 2               3

अपक्ष                12             13

2019 च्या निकालात पोस्टल बॅलेट व ईव्हीएम निकालाचा पाटर्न सारखा आहे, तफावत नाहीच. मात्र 2024 च्या निकालात सगळेच उलटसुलट आहे. शरद पवारांना फक्त 10, उद्धव ठाकरे यांना 20 आणि काँग्रेसला 16 जागा मिळाल्या. हे न पटणारे आहे. शिंदे हे 15 ते 20 मध्येच राहायला हवे. अजित पवार 20 आणि भाजप 65 ते 70 हाच जमिनीवरचा माहौल व निवडणूक निकालानंतरचे हेच सर्वेक्षण स्पष्ट आहे. भाजपला अपेक्षेपेक्षा 60 जागा जास्त मिळाल्या. असे Post Poll सर्व्हे सांगत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरचा विश्वास पूर्णपणे उडवणारे हे निकाल व निकालानंतरचे  सर्वेक्षण आहे. भाजप आघाडीस दणदणीत विजय मिळाला. त्या विजयाचे श्रेय श्री. फडणवीस यांना मिळाले. पण हरण्याचे कारण नसताना महाविकास आघाडीची पीछेहाट झाली. गावखेड्यात भाजपला स्थान नव्हते. तेथे त्यांचा विजय झाला. हा सर्व खेळ कसा झाला? आम्ही का हरलो? हरण्याचे कारण दिसत नाही. निकालानंतरच्या पंचनाम्यात महायुतीच्या मोठ्या विजयाचेही कारण दिसत नाही. मग महाराष्ट्रात हे असे का घडले?

हे असे का घडले? याचे उत्तर सोलापूरच्या मारकडवाडीतील मतदारांनी दिले. त्यांचा आवाज सरकारने बंद केला!

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?