अडीच वर्ष आरोग्यमंत्री असूनही बनावट औषधांच्या रॅकेटबाबत सावंतांनी काहीच केलं नाही – सुनील प्रभू
बीड जिह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुरल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीत बनावट औषध आढळल्याचं समोर आलं आहे. या बोगस औषधांचे कनेक्शन भिवंडीपासून गुजरातच्या सुरतपर्यंत पोहचल्याचे उघडलीस आलं आहे. याच्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी महायुती सरकार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. अडीच वर्ष आरोग्यमंत्री असूनही बनावट औषधांच्या रॅकेटबाबत सावंतांनी काहीच केलं नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
सुनील प्रभू म्हणाले आहेत की, रुग्णांच्या जीवनाशी खेळणाऱ्या आणि बोगस औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ते म्हणाले की, ठाणे – भिवंडी कनेक्शन असणारी जी कंपनी आहे, त्यांच्यावर सरकारचा वरदहस्त होता का? असा संशय असल्याचं सुनील प्रभू म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List