कितीही कोटी कमावले तरी कर भरावा लागत नाही, ‘हे’ आहे देशातील एकमेक आयकर मुक्त राज्य
देशात असंही एक राज्य आहे, जिथे तुम्ही कितीही पैसे कमावले तरी कर भरावा लगत नाही. कोण आहे हे राज्य, आणि या येथील रहिवासींना कर भरावा लागत नाही, याचबद्दल सावितर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर देशातील एकमेक आयकर मुक्त राज्याचे नाव आहे ‘सिक्कीम’.
का नाही भरावा लागत कर?
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील आयकर कायद्याच्या कलम 10 (26AAA) अंतर्गत देण्यात आलेल्या विशेष सूटमुळे सिक्कीममधील लोकांना आयकर द्यावा लागत नाही. 1975 मध्ये हिंदुस्थानात विलीन झाल्यापासून सिक्कीमला आयकरातून सूट देण्यात आली आहे.
सिक्कीम हिंदुस्थानच्या सामील होण्यापूर्वी त्याची स्वतंत्र कर प्रणाली होती आणि भारतीय आयकर कायदे रहिवाशांना लागू नव्हते. ही व्यवस्था कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सिक्कीमला आयकरातून सूट दिली. 2008 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पांतर्गत सिक्कीम टॅक्स अॅक्ट रद्द करण्यात आला आणि आयकर कायद्याच्या कलम 10(26AAA) द्वारे ही सूट लागू करण्यात आली. घटनेच्या कलम 371 (एफ) अंतर्गत सिक्कीमचा विशेष दर्जा राखण्यासाठी ही विशेष सूट देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List