निमित्त – मानवाधिकार आयोगाचा मानवी हक्कांसाठी लढा

निमित्त – मानवाधिकार आयोगाचा मानवी हक्कांसाठी लढा

>> वर्षा चोपडे

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. या वर्षीची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाची थीम ‘समानता – असमानता कमी करणे आणि मानवी हक्कांची प्रगती’ ही आहे. सर्वांना समान संधी, समान अधिकार आणि जगात शांतता निर्माण करणे हाच यामागचा मुख्य उद्देश्य असतो.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. सर्वांना समान संधी, समान अधिकार आणि जगात शांतता निर्माण करणे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 1948 मध्ये मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली. 10 डिसेंबर 2024 ची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाची थीम ‘समानता-असमानता कमी करणे आणि मानवी हक्कांची प्रगती’ ही आहे.

ऑक्टोबर 1991 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी राष्ट्रीय संस्थांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत स्वीकारले गेले आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याच्या नियमावलीद्वारे मान्यता दिली. कायद्याच्या कलम 12 मध्ये नमूद केल्यानुसार आयोगाची कार्ये आणि मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा सार्वजनिक सेवकाकडून अशा उल्लंघनास प्रतिबंध करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याव्यतिरिक्त आयोग मानवाधिकारांवरील करार आणि आंतरराष्ट्रीय साधनांचा अभ्यास करतो. सरकारला त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारस करतो.

आयोगाची जबाबदारी जनतेमध्ये मानवी हक्क जागरूकता पसरवणे आणि मानवाधिकार साक्षरतेच्या क्षेत्रातील सर्व भागधारकांच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचवण्याचे काम करते. मानवी हक्कांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा तसेच प्रत्येक नागरिकास आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात समान न्याय मिळणे या गोष्टी अंतर्भूत होतात. द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध आवाज उठवणे, चुकीच्या माहितीचा सामना करणे, अमानवीय धोरणे बदलण्याचे काम, दुर्बल घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी मानवी हक्क दिनाचे आयोजन आणि राजकीय निर्णय घेण्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे अशी अनेक कामे पार पडली जातात. खरे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीशील उपायांद्वारे सर्व समसमान आणि सगळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देणे, कुणावर अमानवीय अत्याचार झाले तर त्याची दखल घेऊन न्याय देणे हा मानवी हक्क दिनाचा उद्देश आहे. The National Human Rights Commission (NHRC) of India अर्थात देशाच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची (NHRC) स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली. ज्या कायद्याच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे, NHRC हे मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी भारताच्या राष्ट्रीयत्व, निवासस्थान, लिंग, राष्ट्रीय किंवा वांशिक मूळ, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीच्या आधारावर भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांची हमी देते. व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, सामाजिक धार्मिक समानता हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. भारताच्या घटनेने प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीच्या त्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. NHRC ही एक विशेष संस्था आहे. कारण ती जगातील काही राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांपैकी (NHRIs) एक आहे, ज्यांचे अध्यक्ष देशाचे माजी सरन्यायाधीश आहेत. देशांतील नागरी समाजाचे सदस्य, वकील आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा यात समावेश असतो. ‘समानता स्वीकारा, भेदभाव समूळ नष्ट करून जगा आणि जगू द्या’ हा आयोगाचा उद्देश आहे.

अमेरिकेत दरवर्षी 23 डिसेंबर रोजी ह्युमन राइट हा दिवस साजरा केला जातो. ह्युमन राइट हा दिवस धर्मनिरपेक्ष, करुणा, मानवता आणि आशा या सकारात्मक, धर्मनिरपेक्ष मानवी मूल्यांवर केंद्रित आहे.देशातील हिंदुस्थानातील 25 राज्यांनी SHRC ची स्थापना केली आहे. पंतप्रधान (अध्यक्ष) गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते (कनिष्ठ सभागृह), राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (वरचे सभागृह), लोकसभेचे अध्यक्ष (कनिष्ठ सभागृह), राज्यसभेचे उपसभापती (वरचे सभागृह) द्वारे कामकाज बघितले जाते. सध्या आयोगाच्या कार्यवाहक अध्यक्षा श्रीमती विजया भारती सयानी आहेत. दिल्लीला मुख्य कार्यालय आहे.
मानवी हक्क उल्लंघनाच्या तक्रारी हाताळणे, मानवी हक्कांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन करणे, विविध मानवी हक्क समस्यांवर जागरूकता कार्यशाळा/परिसंवाद/परिषदेचे आयोजन, उपक्रमांची अंमलबजावणी, प्रकरणांचा तपास, आंतरराष्ट्रीय समन्वय आणि सहकार्य, मीडिया आणि प्रकाशनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे ही कार्ये हाताळली जातात. महाराष्ट्र स्टेट ह्युमन राइट्स कमिशनचे अर्थात महाराष्ट्र मानवी हक्क अधिकाराचे ऑफिस मुंबईला आहे.

https://nhrc.nic.in/about-us/about-the-Organisation या लिंकवर ऑनलाइन स्वरूपात पीडित किंवा पीडिता तक्रार नोंदवू शकते. The Protection of Human Rights Act, 1993 (with Amendment Act, 2006) The Protection of Human Rights (Amendment) ACT, 2019 इतर माहिती तुम्ही विस्तृतपणे सरकारी साइटवर वाचू शकता.

[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?