साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 08 डिसेंबर ते शनिवार 14 डिसेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 08 डिसेंबर ते शनिवार 14 डिसेंबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – उतावळेपणा नको

स्वराशीत हर्षल वक्री, शुक्र, मंगळ प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो सुरळीत चाललेली चर्चा अचानक तणाव, वाद याकडे झुकण्याची शक्यता आहे. नम्रता, संयम ठेवा. नवीन परिचय उत्साह वाढवणारा. नोकरीत परीक्षेसारखा कालावधी. धंद्यात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठरविल्यापेक्षा वेगळीच कलाटणी मिळेल.

शुभ दि. 12, 14

वृषभ – कार्याचे कौतुक होईल

मेषेत हर्षल वक्री. बुध, शुक्र लाभयोग. मेहनत, जिद्द, नियमितपणा ठेवा. मोठे यश संपादन करता येईल. नोकरीत व्याप असला तरी प्रभाव वाढेल. धंद्यात तेजी, वसुली करा. कर्जाचे काम होईल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. योजनांना पुढे न्या. स्पर्धेत प्रगती होईल.

शुभ दि. 8, 14

मिथुन – धंद्यात सावध रहा

मेषेत हर्षल वक्री, चंद्र, शनि लाभयोग. फार मोठय़ा अपेक्षा न ठेवता काम करा. व्यसन टाळा. सर्वत्र कायदा पाळा. डोळ्यांची काळजी घ्या. नोकरी टिकवा. वाद, तणाव टाळा. नविन परिचय नुकसानकारक. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने कार्य करा. प्रतिष्ठेला जपा.

शुभ दि. 8, 12

कर्क – मनाप्रमाणे यश मिळेल

मेषेत हर्षल वक्री, शुक्र, मंगळ प्रतियुती. प्रत्येक दिवस यशस्वी ठरवता येईल. रविवार धाडस नको. वाद टाळा. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे यश मिळेल. धंद्यात नवीन भागीदार शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. तुमचे मुद्दे अभ्यासपूर्ण असतील. तुमच्या क्षेत्रात आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल.

शुभ दि. 12, 14

सिंह – नोकरीत सावध रहा

मेषेत हर्षल वक्री, चंद्र गुरू लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद, गैरसमज होतील. मनावर दडपण होईल. जवळच्या व्यक्ती तुटकपणा दर्शवतील. नोकरीत सावध रहा. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक तणाव जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या. नवीन ओळखीवर विश्वास ठेऊ नका.

शुभ दि. 8, 14

कन्या – कर्जाचे काम होईल

मेषेत हर्षल वक्री, बुध गुरू लाभयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे करून घ्या. सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवेल. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. तुमचे यश अधिक वाढवण्याचा प्रयत्न करा. जनसंपर्क वाढवा. मानसन्मान मिळेल.

शुभ दि. 10, 14

तूळ – गैरसमज दूर करा

मेषेत हर्षल वक्री, चंद्र बुध त्रिकोणयोग. अडचणीतून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील गैरसमज दूर करा. धंद्यात वसुली करा. नवा परिचय, चर्चा यामुळे उत्साह, आत्मविश्वास वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांकडून आश्वासन मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. गुप्त कारवायांकडे लक्ष द्या.

शुभ दि. 8, 12

वृश्चिक – उत्साह वाढेल

मेषेत हर्षल वक्री, शुक्र मंगळ प्रतियुती. महत्त्वाकांक्षा, उत्साह वाढेल. अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. जुना वाद कमी करून बौद्धिक एकमत साधता येईल. नोकरीत चांगला बदल होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठण्याचे ध्येय गाठता येईल.

शुभ दि. 10, 14

धनु – प्रकृतीची काळजी घ्या

चंद्र, शुक्र लाभयोग, मेषेत हर्षल वक्री. भावनेच्या आहारी जाऊन इतरांच्या दडपणाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत तणाव राहील. धंद्यात कायद्याला धरून कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दि. 8, 12

मकर – संयमी विचार करा

मेषेत हर्षल वक्री, सूर्य चंद्र त्रिकोण योग. साडेसाती सुरू आहे. संयमी विचारातून भूमिका घ्या. नोकरीत कौतुकास्पद कर्तव्य कराल. धंद्यात अनेक मोठय़ा व्यक्ती पाठीशी उभ्या राहतील. नवे काम मिळेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे अस्तित्व अधिक महत्त्वपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवे परिचय उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे ठरतील.

शुभ दि. 8, 14

कुंभ – धंद्यात फसगत टाळा

मेषेत हर्षल वक्री, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहवासाने विचारांना चालना मिळेल. नवे मुद्दे तयार कराल. धंद्यात फसू नका. नोकरीत प्रभाव राहील. परिचय वाढतील. सावध रहा. गैरफायदा घेतला जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला दिशा मिळेल. पद, अधिकार लाभतील.

शुभ दि. 10, 12

मीन –कामाचे कौतुक होईल

मेषेत हर्षल वक्री, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. विचारांना, कार्याला चालना देणारे प्रसंग उत्साह वाढवतील. वेगाने काम पूर्ण करता येईल. नोकरीत बढती होईल. कामाचे कौतुक होईल. धंद्यात नवे धोरण फायदा वाढवणारे ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून पुढचा मार्ग स्वीकारा. मानसन्मान लाभेल.

शुभ दि. 12, 14

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?