दर्शनाला येताना छोटे कपडे घालू नका, ठाकूर बाके बिहारी मंदिर समितीचं भाविकांना आवाहन
हिंदुस्थानातील मथुरा जिल्ह्यात वृदांवन धाम येथील प्रसिद्ध ठाकूर बाके बिहारी मंदिरात दरदिवशी हजारो संख्येने भाविक येत असतात. तिथे लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात. अशातच आता ठाकूर बिहारी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने आवाहन केले आहे. येणाऱ्या भक्तांनी छोटे, तोकडे, फाटलेले आणि मिनी स्कर्ट घालून देवाच्या दर्शनाला येऊ नये.
समितीच्या या आवाहनानंतर, भाविकांच्या मनात प्रश्नांचे काहुर माजले. ठाकुर बिहारी मंदिर आणि अन्य मंदिरांनी अशा प्रकारे आवाहन पहिल्यांदा केलेले नाही. याआधीही ठाकूरजींचे दर्शन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि मंदिर सेवकांनी छोटे कपडे घालून मंदिरात न येण्यासाठी आवाहन केले. मंदिर व्यवस्थापन समितीने आवाहनासोबतच ठाकूर बांके बिहारी मंदिराच्या गल्लीच्या बाहेर पोस्टरही लावण्यात आले. ज्यामध्ये लिहिले होते की, मंदिरात येणाऱ्या सर्व महिला पुरुषांना आवाहन आहे की मंदिरात दर्शन करायला येताना छोटे, तोकडे, मिनी स्कर्ट, फाटलेले असे कपडे घालू नये.
आज सकाळी भाविक दर्शनासाठी गेट क्रमांक 3 वर पोहोचताच त्यांना दर्शनासाठी माफक कपडे परिधान करून सहकार्य करण्याचे आवाहन करणारे बॅनर रस्त्यावर लावलेले दिसले. हे पर्यटन स्थळ नसून धार्मिक स्थळ असल्याचे फलकावर लिहिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List