Santosh Deshmukh Case – प्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तात्काळ धडा शिकवा! – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके, आमदार राजेश टोपे आणि आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामुळे बीडसह मस्साजोगमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना शरद पवार यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी गावकऱ्यांना धीर देत शरद पवार यांनी दहशतीतून बाहेर पडा असे म्हटले. तसेच प्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधार शोधा आणि धडा शिकवा असा इशाराही केंद्र आणि राज्य सरकारला दिला.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 10 लाखांची आर्थिक मदत केली आहे. याचाच उल्लेख करत शरद पवार म्हणाले की, आर्थिक मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तात्काळ धडा शिकवला पाहिजे.
बीड जिल्ह्यात घडलेली घटना राज्याला शोभणारी नाही. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आपण त्यांच्यासोबत आहोत. दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडा. आपण सगळे मिळून याला तोंड देऊ. त्यानंतर कुणीही आपल्याला आडवू शकत नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
दहशतीतून बाहेर पडा, याला आपण सगळे मिळून तोंड देऊ! – शरद पवार यांनी बीडमधील मस्साजोग येथे जाऊन दिला गावकऱ्यांनी धीर pic.twitter.com/NE61jskO6G
— Saamana Online (@SaamanaOnline) December 21, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List