राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? वडेट्टीवार यांनी उपस्थित केला प्रश्न
राज्यपालांच्या अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते पह्ल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.
शेतकऱयांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुतीने जाहीरनाम्यात केली होती, अजूनही सरकारने शेतकऱयांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेले नाही. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2 हजार 100 रुपये देणार असे आश्वासन दिले, पण अजूनही त्याच्या अंमलबजावणीबाबत चित्र स्पष्ट नाही. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 28 टक्के वाढ झाली आहे, सामान्यांचे घरचे बजेट कोलमडले आहे अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली. लाडकी बहिणीचे पैसे बँकेने कर्जासाठी वळवल्याचे उदाहरण समोर आले आहे. अमरावतीमधील निर्मला चारपे यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, ते बँकेने परस्पर कर्जासाठी वळवण्यात आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List