Maharashtra news – खातेवाटपाचा नारळ फुटणार की पुन्हा दिल्लीश्वरांचा कौल घेतला जाणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला आणि 15 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर महायुतीतील मंत्र्यांची नावेही जाहीर झाली. याला आता आठवडा उलटला असून दुसरीकडे हिवाळी अधिवेशनही संपत आले आहे. मात्र अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांचा चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर तरी खातेवाटपाचा नारळ फुटतो की पुन्हा दिल्लीश्वरांचा कौल घ्यावा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List