थंडीचा महिना! कश्मीर खोऱ्यातील धबधबे गोठले!!
देशातील अनेक भागात थंडीचा जोर वाढला आहे. थंडी वाढल्याने अनेक ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी शेकोटी पेटलेली दिसत आहे. जम्मू-कश्मीरच्या खोऱ्यात तर तापमान प्रचंड खाली घसरले आहे. कश्मीर खोऱ्यात असलेले अनेक धबधबे सध्या गोठलेले दिसत आहेत. सर्व बाजूला पांढरे शुभ्र दिसत आहे. कश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे.
केद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये प्रचंड थंडी पडली आहे. कश्मीरमधील सर्वात जास्त थंड ठिकाण हे जोजिलामध्ये नोंदले गेले आहे. जोजिलामध्ये मायनस 23 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे. श्रीनगर, गुलमर्गमध्ये तापमान मायनसमध्ये गेले आहे. अमरनाथ यात्रेसाठी शिबीर असलेल्या पहलगाममध्ये तापमान हे शून्य ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदवले आहे. कश्मीर खोऱ्यात अनेक धबधबे गोठल्याने या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. पर्यटक येथील दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहेत.
कश्मीरमधील मायनस तापमान
- जोजिला – 23 डिग्री सेल्सिअस
- अनंतनाग – 8.9 डिग्री सेल्सिअस
- पुलवामा – 8.5 डिग्री सेल्सिअस
- शोपियान – 8.9 डिग्री सेल्सिअस
- सोनमर्ग – 7.7 डिग्री सेल्सिअस
- बडगाम – 6.7 डिग्री सेल्सिअस
- श्रीनगर – 5.3 डिग्री सेल्सिअस
- कुलगाम – 5.8 डिग्री सेल्सिअस
- बारामुला – 5.0 डिग्री सेल्सिअस
- बांदिपोरा – 5.6 डिग्री सेल्सिअस
- जम्मू – 4.9 डिग्री सेल्सिअस
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List