दैवज्ञ समाजाचे चलो पुणे; आजपासून चार दिवस राष्ट्रीय अधिवेशन आणि साहित्य संमेलन

दैवज्ञ समाजाचे चलो पुणे; आजपासून चार दिवस राष्ट्रीय अधिवेशन आणि साहित्य संमेलन

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन 19 ते 22 डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणार असून उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशन आणि साहित्य संमेलनास महाराष्ट्रातील दैवज्ञ समाजाने ‘चलो पुणे’चा नारा दिला आहे. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार असून पुण्यातील अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट संस्थेने त्याची जय्यत तयारी केली आहे.

दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे 21 वे राष्ट्रीय अधिवेशन व दहावे दैवज्ञ साहित्य संमेलनाचा भव्य सोहळा उद्या गुरुवारपासून पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश कला-क्रीडा मैदानावर होणार आहे. गुरुवारी 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे. शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता उद्घाटन होणार आहे. पद्माकरराव पांडुरंगपंत रत्नपारखी व सुमती रत्नपारखी नगरीत सकाळी 10 वाजता केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गजानन रत्नपारखी व अजय कारेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजश्रेष्ठा सुरेंद्र शंकरशेट, डॉ. गजानन रत्नपारखी मार्गदर्शन करणार आहेत.

साहित्य, नाटय़, ग्रंथहंडी व कार्यकर्ता गौरव

रविवारी 22 डिसेंबर रोजी संतसाहित्य, प्रेरणादायी आत्मचरित्र, पत्रकारिता आणि साहित्य, नाटय़ व साहित्य यावर विविध मान्यवर लेखक, साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ग्रंथहंडीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात यजमान संस्थेचे पदाधिकारी, दैवज्ञ साहित्य मंचचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून दुपारी 3 वाजता अधिवेशनाचा समारोप होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विजय कारेकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली.

परिसंवाद रंगणार

शनिवारी 21 डिसेंबर रोजी विविध परिसंवाद रंगणार आहेत. दुपारी 3 वाजता दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स...
पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख
मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक
मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या
मुंबई विमानतळावर गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; बँकॉकहून आलेल्या केरळच्या प्रवाशाला अटक