बॉयलरचे धोरण आहे, त्याचप्रमाणे रिएक्टरबाबतही धोरण असावे; अंबादास दानवे यांची मागणी
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील रिअॅक्टरच्या स्फोटाकडे लक्ष वेधले आहे. राज्यात बॉलरबाबत जसे धोरण आहे, तसेच धोरण रिअॅक्टरबाबतही धोरण असावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
अनेकदा रिअॅक्टर नादुरुस्त असतात, त्यामुळे स्फोट होतात. त्यामुळे बॉयलरप्रमाणे रिअॅक्टरबाबतही धोरण असावे, अशी मागणी आपण वारंवार करत आहोत, असे दानवे म्हणाले. मोठ्या कंपन्यांनी विकलेले नादुरुस्त रिअॅक्टर छोट्या कंपन्या वापरतात. त्यामुळे स्फोट होतो आणि त्यात शेकडो जणांचा बळी जातो. त्यामुळे रिअॅक्टरबाबत तातडीने धोरण बनवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले. बॉयलरचे धोरण आहे, तसेच रिएक्टरबद्दल सुद्धा धोरण असावे, कारण सर्व स्फोट हे रिएक्टरमुळे होतात. लहान कंपन्या मोठ्या कंपन्यांनी विकलेले नादुरुस्त रिएक्टर वापरतात, आणि ह्यामुळे दुर्घटना झाल्यास शेकडो बळी जातात. म्हणून औद्योगिक सुरक्षा विभागालाही सुरक्षित करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List