हनुमान मंदिर, रस्ते घोटाळा अन् महायुती सरकार; आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
गेल्या दोन वर्षांत मी अनेकदा शिंदे सरकारने बीएमसीअंतर्गत केलेले रस्ते घोटाळे पुराव्यांसह उघड केले आहे. आता भाजपला एसआयटी स्थापन करण्याची आठवण झाली आहे. मी 15 जानेवारी 2023 रोजी हा घोटाळा उघड केला होता. त्यानंतरही सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. पण तेव्हा भाजपने शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला पाठिंबा दिला होता, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आहेत. आज एका आयोजहित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. जाणून घेऊ त्यांच्या पत्रकार परिषदमधील महत्वाचे मुद्दे..
आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदमधील महत्त्वाचे मुद्दे:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं जे नकली हिंदुत्व आहे, ते उघड केलं आहे. रेल्वेने हनुमान मंदिर पाडण्यासाठीची नोटीस काढली होती, ती स्थगित केली आहे.
बीएमसी आता मुंबईकरांवर रोजचा कचरा उचलण्याकरिता युजर फी आकारण्याचा विचार करत आहे. याआधी कधीही असे घडलेले नाही. बीएमसीचे हे कर्तव्य असताना, मुंबईकरांनी या सेवेसाठी पैसे का द्यावे? आम्ही बीएमसीच्या माध्यमातून अनेक वेळा मुंबईची सेवा केली आहे, पण मुंबईकरांवर कधीही असा आर्थिक बोजा लादला नाही.
जेव्हा कधी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आढळतील तेव्हा बीएमसी मुंबईकरांना पैसे देणार का? गेल्या दोन वर्षांपासून कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत बीएमसी अपयशी ठरली आहे.
गेल्या दोन वर्षांत मी अनेकदा शिंदे सरकारने बीएमसीअंतर्गत केलेले रस्ते घोटाळे पुराव्यांसह उघड केले आहे. आता भाजपला एसआयटी स्थापन करण्याची आठवण झाली आहे. मी 15 जानेवारी 2023 रोजी हा घोटाळा उघड केला होता. त्यानंतरही सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. पण तेव्हा भाजपने शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला पाठिंबा दिला होता.
जर मुख्यमंत्र्यांना खरोखरच नवीन सुरुवात करायची असेल तर ह्या भ्रष्टाचाराचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे; त्यामध्ये तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबईचे दोन्ही पालक मंत्र्यांचाही समावेश असावा. एसआयटी हे केवळ निवडणुकीपुरते भाजपने उचललेले पाऊल आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांचाच शिंदेंच्या भ्रष्टाचारी राजवटीला पाठींबा होता.
आज पत्रकार परिषद घेऊन, मी मुंबई आणि @mybmc संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले:
• बीएमसी आता मुंबईकरांवर रोजचा कचरा उचलण्याकरिता “युजर फी” आकारण्याचा विचार करत आहे. ह्याआधी कधीही असे घडलेले नाही. बीएमसीचे हे कर्तव्य असताना, मुंबईकरांनी ह्या सेवेसाठी पैसे का द्यावे?… pic.twitter.com/clRr0GpgXY
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 14, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List