Allu Arjun : अल्लू अर्जुनची बायको Sneha Reddy आहे तरी कोण ? या क्षेत्रात मोठा दबदबा
‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन याचे लाखो-करोडो चाहते आहेत. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या चेंगराचेंगरीत एक महिलेचा मृत्यू झाला होता. याचप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यावर चिक्कडपल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सध्या तो या गोंधळामुळे चर्चेत आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तो खूप प्रायव्हेट आहे. अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही देखील त्याच्याप्रमाणेच यशस्वी आहे. ती एक बिझनेसवुमन असली तरी लाईमलाइटपासून दूरच असते. जाणून घेऊया तिच्याबद्दल..
स्नेहाशी पहिली भेट कुठे झाली ?
अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची पहिली भेट एका लग्नात झाली होती. त्यावेळी अल्लू अर्जुनला स्नेहाला पहिल्यांदा भेटण्याची संधी मिळाली आणि ‘पहिल्या नजरेतच प्रेम’ झालं. स्नेहाच्या सौंदर्याने आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाने अल्लू अर्जुन इतका प्रभावित झाला की लवकरच तो स्नेहासोबत त्याचे भविष्य पाहू लागला. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 मध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत स्नेहा आणि अल्लू अर्जुन यांचा विवाह झाला.
लाईमलाइटपासून दूर
स्नेहा आणि अल्लू अर्जुन यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. ते एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणे शांतपणे जीवन जगतात. स्नेहाचे कुटुंबीय फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत नाहीये. मात्र असे असेल तरी अल्लू अर्जुनच्या यशात तिचा मोलाचा वाटा आहे. फिल्मी ग्लिझपासून दूर राहून कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय सांभाळत स्नेहा शांतपणे जगते.
यशस्वी बिझनेस वुमन
स्नेहा ही एक यशस्वी, श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातून आली आहे. हैदराबादमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने केंब्रिज विद्यापीठातील एमआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स डिग्री संपादन केली.2016 मध्ये तिने तिचा बिझनेस सुरू केला. हैदराबाद च्या ज्युबली भागात तिने “पिकाबू” नावाचा ऑनलाइन फोटो स्टुडिओ लाँच केला. स्नेहाचा स्टुडिओ यशस्वीपणे सुरू असून लोकप्रिय ब्रँड बनला आहे. रिपोर्ट्सनुसार, स्नेहा रेड्डीचे नेटवर्थ 42 कोटींच्या आसपास आहे. सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय आहे, इन्स्टाग्रामवरही ती बरीच ॲक्टिव्ह असते. तेथे तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List