खाद्य तेलामुळे कर्करोगाचा धोका वाढतोय? अमेरिकेच्या अभ्यासात करण्यात आला दावा
दररोज स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाला कुकिंग ऑईल असं म्हणतात. या तेलात अनेक प्रकार असतात. प्रत्येकजण आपल्या सोईनुसार खाद्यतेलाची निवड करतो. तळलेल्या तसेच शिजवलेल्या पदार्थांमधील मऊपणा आणि चव वाढवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. मात्र, स्वयंपाकाच्या तेलामुळे अनेक मोठे आजार होऊ शकतात, हे तुम्हाला माहित आहे का?
स्वयंपाकाचे तेल कर्करोगास कारणीभूत ठरू शकते, असे अमेरिकन सरकारद्वारे केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. स्वयंपाकाच्या तेलामुळे कर्करोग होऊ शकतो, विशेषतः तरुणांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. सूर्यफूल, द्राक्षांची बियाणे, कॅनोला आणि मका या बियाण्यांच्या तेलाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो, अशी माहिती वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात कोलन कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 80 रुग्णांवर रिसर्च करण्यात आला. यावेळी या रुग्णांमध्ये बायोएक्टिव्ह लिपिड्सचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. जे सीड्स तेलाच्या विघटनानंतर तयार होतात. या संशोधनात 30 ते 85 वर्षे वयोगटातील 81 लोकांच्या ट्यूमरचे नमुने पाहण्यात आले. यावेळी कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये लिपिडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.
बियांचे तेल आणि कर्करोग यांच्यातील संबंध
दरम्यान, यापूर्वीही संशोधनात बियांच्या तेलाचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम समोर आले होते. यामुळे शरीरात सूज येऊ शकते. तथापि, बियाण्यांचे तेल तुटलेले बायोएक्टिव्ह लिपिड्स कोलन कॅन्सरचा वेग वाढवण्यास मदत करू शकतात आणि शरीराला ट्यूमरशी लढण्यापासून रोखू शकतात. बियांच्या तेलामध्ये ओमेगा -6 आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. बियांच्या तेलाच्या जास्त वापरामुळे होणारी जळजळ कर्करोगाच्या विकासास प्रोत्साहन देऊ शकते. या प्रक्रियेवर अद्यापही संशोधन सुरू आहे.
स्वयंपाकाचे तेल कसे निवडावे?
आरोग्यासाठी: जर तुम्ही निरोगी आहार घेत असाल तर ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूल तेल यासारखे हलके तेल निवडणे चांगले.
स्वयंपाक करण्याच्या पद्धतीनुसार: शेंगदाणा किंवा सोयाबीन तेलाचा तळण्यासाठी वापर करणे नेहमी चांगले आहे, तर ऑलिव्ह तेल हे सॅलाड आणि हलके अन्न बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
चव आणि सुगंधासाठी: जर तुम्हाला जेवणात विशेष चव हवी असेल तर तुम्ही तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल वापरू शकता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List