कागल फाइव्ह स्टार एमआयडीसीत ‘बॉम्बा ‘बोंबने घबराट, ‘बॉम्ब थ्रेट मॉकड्रिल’ असल्याचे जाहीर करताच सुटकेचा निःश्वास

कागल फाइव्ह स्टार एमआयडीसीत ‘बॉम्बा ‘बोंबने घबराट, ‘बॉम्ब थ्रेट मॉकड्रिल’ असल्याचे जाहीर करताच सुटकेचा निःश्वास

वेळ सकाळी 11 वाजताची. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीत मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला. फोनवरून अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून, घातपात घडवणार असल्याची धमकी दिली. यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली. बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्कॉडने तपासणी केल्यानंतर हे मॉकड्रिल असल्याचे जाहीर करताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

निनावी फोन आल्यानंतर एच.पी. ऑइल गॅसच्या कंट्रोल रूमने त्वरित दिलेल्या माहितीनंतर कंपनीच्या प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांनीही तातडीने पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ हे टीमसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अगदी जलद गतीने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन टीम, कागल एमआयडीसी फायर ब्रिगेड टीमला पाचारण केले. संपूर्ण परिसर रिकामा करून परिस्थितीचा ताबा घेत, काही वेळातच या ठिकाणी बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्कॉड (बॉम्बशोध व निकामी पथक) दाखल झाले. या पथकाने त्वरित आपली कारवाई सुरू करून आधुनिक साधनांसह तसेच श्वानासह संपूर्ण परिसराची झडती घेतली. दरम्यान, पथकास एक बॉम्बसदृश संशयित वस्तू प्राप्त झाली. पथकाने त्वरित ही वस्तू पाहणी करून अत्याधुनिक साधनांनी त्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान यात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा स्फोटके नसल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण खात्रीनंतर या पथकाने सर्वांना सुरक्षिततेचा इशारा देताच उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर हे एक ‘बॉम्ब थ्रेट मॉकड्रिल’ असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले.

कोणतीही पूर्वकल्पना नसतानादेखील सर्व शासकीय विभागांनी अत्यंत कमी वेळेत दाखवलेली तत्परता प्रशंसनीय होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रसाद संकपाळ, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर, कागल एमआयडीसी फायर ब्रिगेड विभागाचे प्रमुख संदीप माने, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पी. वाय. पाटील, बॉम्बविरोधी पथकाचे राजेंद्र संताराम, तसेच एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्याचेही मॉकड्रिल हवे; अन्यथा ही शहीद होण्याची रंगीत तालीम ?

■ अतिरेकी विरोधी कारवाई असो की, बॉम्ब सापडल्याची अफवा, यासंदर्भात कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून मॉकड्रील घेण्यात येते. पण मॉकड्रीलवेळी कारवाई करण्यास पुढे असलेले जवान कसल्याही सुरक्षित उपकरणाशिवाय पुढे असल्याचे दिसून येते. प्रत्येक वेळी बुलेटप्रूफ जॅकेटचा अभाव दिसून येतो, तर बॉम्बसदृश वस्तू सापडल्यानंतर तो निकामी करण्यासंदर्भात मात्र कसलेही प्रात्यक्षिक करण्यात येत नसल्याचेही दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारचे मॉकड्रील म्हणजे एक प्रकारे शहीद होण्याची रंगीत तालीमच होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?