रात्रीची 76 लाख मतं कशी वाढली? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
निवडणूक आयोग कुणाची कळसुत्री बाहुली झाली आहे हे सगळ्यांनाच माहित आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच रात्रीची 76 लाख मतं कशी वाढली? असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.
नाना पटोले आज मारकडवाडीत पोहोचले. तेव्हा माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोग कुणाची कळसूत्री बाहुली झाली आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. रात्रीची 76 लाख मतं वाढली त्याचा हिशोब का देत नाही? असा सवाल पटोले यांनी विचारला.
तसेच ही सत्ता येईल जाईल पण लोकशाही टिकली तर सारं काही राहिल. या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ही काही आरोप प्रत्यारोपाची वेळ नाही. मारकडवाडीच्या लोकांनी जी भुमिका घेतली आहे ती खऱ्या अर्थाने देशातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज ते बनलेले आहेत. त्याचे समर्थन करण्याची गरज आहे. ही लोकशाहीला वाचवण्याची लढाई असून यात सर्वांनी सामील झाले पाहिजे ही आमची भुमिका आहे असेही पटोले म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List