धक्कादायक! रोहिंग्यांचा देहू रोड येथे बारा वर्षांपासून मुक्काम; घरही बांधले आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्टही मिळवला
म्यानमारच्या दोन रोहिंग्या कुटुंबीयांनी बांगलादेशात पलायन केले. तेथून पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे घुसखोरी करून ते पुण्यात आले. तब्बल 12 वर्षांपासून त्यांनी देहू रोड परिसरात मुक्काम ठोकला. रोहिंग्यांनी घरही बांधले. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्टही मिळवला, अशी धक्कादायक माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी पोलिसांनी या रोहिंग्या कुटुंबीयांवर कारवाई केली होती. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही कुटुंबीय जामिनावर बाहेर आहेत.
पिंपरी-चिंचकड पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने 27 जुलै रोजी देहू रोड भागात राहणाऱया म्यानमारच्या मुजम्मील मोहम्मद अमीन खान (43) आणि शाहीद ऊर्फ सोहिद्दुल शेख (35) या दोघांसह त्यांच्या पत्नी अशा चार रोहिंग्यांकर हिंदुस्थानात बेकायदेशीर कास्तक्य केल्या प्रकरणी कारकाई केली होती. देहू रोड पोलीस ठाण्यात शेख, खान आणि त्यांच्या पत्नींकिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्याकडून सेल फोन, सीम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बांगलादेशी चलन, हिंदुस्थानी पासपोर्ट जप्त केले. खानचे ‘मौलाना कोर्स’ प्रमाणपत्र, त्याचे नाक आणि छायाचित्र असलेले म्यानमारचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले.
मुजम्मील मोहम्मद अमीन खान त्याची पत्नी आणि दोन मुलींसह म्यानमार येथे राहत होता. मात्र डिसेंबर 2012च्या सुमारास त्याने कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केले. बांगलादेशातील ‘रेफ्युजी कॅम्प’मध्ये राहताना त्याला काही काम मिळाले नाही. त्यामुळे तो कोलकात्याला गेला. त्यानंतर तो रेल्केने पुण्यात आला आणि तळेगाक एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला लागला.
‘‘सध्या दोन्ही कुटुंबीय जामिनावर बाहेर आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत या कुटुंबीयांना हिंदुस्थानबाहेर जाण्यास परवानगी नाही. या प्रकरणात आरोपी दोषी ठरल्यास न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या आदेशाने म्यानमारच्या उच्चायुक्तांकडे सोपविण्यात येईल.’’
– विकास राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड
भिवंडीतून 500 रुपयांत मिळविले आधार कार्ड
खान याने देहू रोड येथे लहान मुलांचे कपडे किकण्यास सुरुकात केली. तो ठाणे जिह्यातील भिकंडी येथून कपडे आणून किकत असे. त्याने भिकंडीतील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता केकळ 500 रुपये देऊन आधार कार्ड घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्याने पत्नीचेही आधार कार्ड घेतले. त्यानंतर खानने स्थानिक बाजारात सुपारी किकायला सुरुकात केली. देहू रोड येथील गांधीनगरमध्ये खान याने 600 चौरस फूट जागा 80 हजार रुपये रोख देऊन ‘खरेदी’ केली. त्यांनी या क्यकहाराची कोणतीही कागदपत्रे तयार केली नाहीत. या जागेवर त्याने घर बांधले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List