किल्ले प्रतापगडावर अलोट उत्साहात शिवप्रताप दिन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि

किल्ले प्रतापगडावर अलोट उत्साहात शिवप्रताप दिन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि

ढोल-ताशांचा निरंतर गजर…रोमांच उभा करणाऱ्या तुताऱ्या – झांजांचा निनाद…शिकप्रभूंचा अखंड जयघोष आणि छत्रपती शिकाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अशा पूर्ण शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडाकर शिवप्रताप दिन अलोट उत्साहात साजरा झाला. यावेळी शिवकालीन साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी शिवप्रेमींच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले.

प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर चालून आलेल्या बलाढ्य अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ले प्रतापगडाच्या माचीवर 10 नोव्हेंबर 1659 रोजी कोथळा काढून स्वराज्यावरील महाप्रचंड संकटाचे पारिपत्य केले होते. शिवरायांच्या या अलौकिक पराक्रमाचे स्मरण शिवप्रताप दिनाच्या माध्यमातून दरवर्षी केले जात असते.

सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीकन गलांडे यांच्या हस्ते प्रतापगडावरील मंदिरात भक्तिमय वातावरणात आईभवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी या महापूजेचे पौरोहित्य केले. भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्कजस्तंभाचे मान्यकरांच्या हस्ते विधिकत पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीच्या सरपंच कांचन साकंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याकेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके

शाहीर सूरज जाधक आणि सहकाऱ्यांनी ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ हा जोशपूर्ण पोकाडा सादर केला. छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान—मोठय़ा विद्यार्थ्यांसह लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकाका आदी ऐतिहासिक साहसी खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली.

पुष्पकृष्टीवेळी शिवभक्त रोमांचित

पालखीचे बालेकिल्ल्याकरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजकळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करून भक्तिभाके पूजन करण्यात आले. मान्यकरांच्या हस्ते शिवपुतळ्यासमोरील चबुतर्‍यावरील भगव्याचे ध्कजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजकून मानवंदना दिली. यादरम्यान छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पकृष्टी करण्यात आली. हे दृश्य पाहताना तमाम शिकभक्तांच्या अंगाकर अक्षरशŠ रोमांच उभे राहिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?