पालघर जिल्ह्यात तीन दिवसांत 26 हजार मतदार वाढले

पालघर जिल्ह्यात तीन दिवसांत 26 हजार मतदार वाढले

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारसंख्या 22 लक्ष 92 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. मतदार नोंदणी करण्याच्या अखेरच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 26 हजार मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात एक लाख 43 हजार 552 मतदार वाढले असून नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

पालघर जिल्ह्यात 11 लाख 87 हजार 589 पुरुष, 11 लाख चार हजार महिला व 231 तृतीयपंथी मतदार असून नालासोपारा मतदारसंघामध्ये सर्वाधिक सहा लाख आठ हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्याखालोखाल बोईसर मतदारसंघात चार लाख 11 हजार, वसई विधानसभा क्षेत्रात तीन लाख 54 हजार, विक्रमगड मतदारसंघात तीन लाख 17 हजार, डहाणू विधानसभा क्षेत्रात तीन लाख एक हजार, तर पालघर विधानसभा क्षेत्रात दोन लाख 98 हजार मतदार आपला हक्क बजावू शकणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर नालासोपारा विधानसभा क्षेत्रात तब्बल 51 हजार मतदारांची वाढ झाली असून बोईसर विधानसभा क्षेत्रात 27 डहाणू विधानसभा क्षेत्रात सुमारे 18 हजार तर विक्रमगड, पालघर व वसई या विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी सुमारे 16 हजार मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे, 16 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत इतर सर्व मतदारसंघांत मतदार संख्या तीन ते साडेतीन हजारांनी वाढली. नालासोपारा विधानसभा क्षेत्रात तब्बल 9907 मतदार वाढल्याचे दिसून आले आहे.

46 हजार नवे मतदार

पालघर जिल्ह्यात 46 हजार नवमतदारांची नोंदणी झाली असून 20 ते 49 वयोगटात तब्बल 66 टक्के मतदार नोंदवले गेले आहेत. नोंदवलेल्या मतदारांपैकी 17,432 मतदार अपंग असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना घरी मतदान करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. त्याचप्रमाणे सैन्यामध्ये कार्यरत असणारे 326 मतदार असून त्यापैकी विक्रमगडमध्ये 121, तर नालासोपारामधील 83 सैन्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून...
Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा…” ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर; रोमान्सपासून ते एक्शनपर्यंत सर्वच खतरनाक!
चरबी कमी करण्यासाठी दररोज प्या ‘हे’ 5 पेय
बुद्धी तल्लख बनवायची असेल तर रोज अंडी खा, अभ्यासकांचा दावा
मुंबई, महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट; उद्धव ठाकरे यांचा घणाघात