ज्यांना गद्दार म्हणतात ते मुख्यमंत्री होतात! उल्हासनगर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ‘बॉम्ब’ फोडला
उल्हासनगरात मिंधे गट व भाजपमध्ये जोरदार तू तू मै मै सुरू झाली आहे. उल्हासनगरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी तर बॉम्बच पह्डला. ‘ज्यांना गद्दार म्हणतात ते मुख्यमंत्री होतात’, असे विधान रामचंदानी केल्याने शिंदे गटाचा प्रचंड चडफडाट झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात मिंधे गट व भाजपच्या नेत्यांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत आहेत. कल्याण पूर्वेत मिंधे गटाचे महेश गायकवाड यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला. तर कल्याण पश्चिममध्येदेखील विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात भाजपचे नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल करून आव्हान उभे केले आहे. एकीकडे मिंधे गट व भाजपमध्ये बिनसले असतानाच आता उल्हासनगरमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मिंधे गटाला आरसा दाखवला आहे.
आपण ज्यांना गद्दार म्हटलं ते मुख्यमंत्री झाले अशा शब्दांत भाजपचे नेते रामचंदानी यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे.
वाचा सविस्तर : https://t.co/xWr2Frk6Dt pic.twitter.com/AfhMV8LChj— Saamana (@SaamanaOnline) November 3, 2024
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांना साई पक्षाने पाठिंबा दिला असून त्यासंदर्भात रिजन्सी हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात प्रदीप रामचंदानी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, ‘ज्यांना गद्दार म्हटले जाते ते मुख्यमंत्री होतात. आता राजकारणाची ही नवी परिभाषा बनली आहे.’ या विधानामुळे मिंधे यांचे बगलबच्चे कमालीचे संतापले असून आम्ही कुमार आयलानी यांचे काम करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
मिंधे गटाची आदळआपट
टाऊन हॉलमध्ये आरपीआय, मिंधे गट व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यात मिंधे यांच्या बगलबच्च्यांनी रामचंदानी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली. याबाबत डोंबिवली भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. या ताणाताणीमुळे शिंदे गट व भाजपमध्ये चांगलेच बिनसल्याचे दिसून आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List