गद्दारीविरुद्ध खुद्दारीचा लढा, चौरंगी लढतीत शिवसेनेचे नितीन सावंत मारणार बाजी

गद्दारीविरुद्ध खुद्दारीचा लढा, चौरंगी लढतीत शिवसेनेचे नितीन सावंत मारणार बाजी

वार्तापत्र – कर्जत खालापूर

 कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे मिंधे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात खोके सरकार सत्तारूढ झाल्यानंतर थोरवे यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गोव्यातील हॉटेलमध्ये माकडउडय़ा मारल्या होत्या. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. याच माकडउडय़ांचा हिशेब चुकता करण्याची तयारी कर्जतच्या मतदारांनी केली आहे. एकीकडे मतदारांची नाराजी आणि दुसरीकडे महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी केलेली बंडखोरी याचा जोरदार फटका थोरवेंना बसणार आहे. या गद्दारीविरुद्ध खुद्दारीच्या चौरंगी लढतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हे बाजी मारतील असेच चित्र आहे.

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नितीन सावंत, मिंधे गटाचे महेंद्र थोरवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर सुधाकर घारे आणि भाजपचे बंडखोर किरण ठाकरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत सत्तेत मग्रूर असलेल्या थोरवे यांनी आपल्या सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱयांना त्रास दिला आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाने थोरवे यांच्या विरोधात फक्त भूमिका घेतलेली नाही, तर त्यांच्या विरोधात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. परिणामी या निवडणुकीत महायुतीच्या मतांची विभागणी होणार असल्याने थोरवे यांचे मताधिक्य घटणार आहे. महायुतीत मोठी धुसफुस असली तरी महाविकास आघाडी मात्र नितीन सावंत यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे सावंत यांनी प्रचारातही मोठी आघाडी घेतली आहे. सावंत यांना मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून थोरवे यांची झोप उडाली आहे.

नितीन सावंत यांचा दांडगा जनसंपर्क, शिवालयात आलेल्या प्रत्येक कर्जत-खालापूरवासीयाच्या प्रश्नांची त्यांनी केलेली सोडवणूक, वाडय़ा-पाडय़ावर जाऊन तेथील जनतेचा स्वखर्चाने सोडवलेला पाणी प्रश्न, निष्ठावंत राहून त्यांनी जिंकलेला कर्जत- खालापूरवासीयांचा विश्वास, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी गावागावात जाऊन काढलेल्या झंझावाती शिव संवाद दौऱयाला लाभलेला मोठा प्रतिसाद, घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा केलेला निर्धार यामुळे नितीन सावंत यांनी आपला ठसा मतदारसंघावर उमटवला आहे.

मनसेचे इंजिन लेट झाले

मनसेचे जगन्नाथ पाटील यांना कर्जत-खालापूर मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांना पाच मिनिटे उशीर झाला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. त्यामुळे लेट झालेले मनसेचे इंजिन यार्डात विश्रांतीसाठी गेले. मनसेने जाणीवपूर्वक अर्ज भरण्याचे टाळले आहे, असे कर्जत-खालापूरकर खुलेआम बोलत आहेत.

सर्वांनाच दुखावले

शासकीय विकासकामात आम्ही ठेकेदार, बाकी तुम्ही आमचे शिलेदार अशी भूमिका घेत स्थानिक कार्यकर्त्यांना दुखावले आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचेही खच्चीकरण करण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. याचा वचपा स्थानिक कार्यकर्ता काढणार असल्याची कुजबुज स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. थोरवे यांनी रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावरही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्याचाही हिशेब याच निवडणुकीत चुकता केला जाईल अशी चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून...
Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा…” ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर; रोमान्सपासून ते एक्शनपर्यंत सर्वच खतरनाक!
चरबी कमी करण्यासाठी दररोज प्या ‘हे’ 5 पेय
बुद्धी तल्लख बनवायची असेल तर रोज अंडी खा, अभ्यासकांचा दावा
मुंबई, महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट; उद्धव ठाकरे यांचा घणाघात