मृत समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले, शोकसभेत मुलगा जिवंत घरी परतला

मृत समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले, शोकसभेत मुलगा जिवंत घरी परतला

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. मृत समजून ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले, तो मुलगा शोकसभेत जिवंत परतलेला पाहून सर्वच हैराण झाले. ब्रिजेश सुथर असे या व्यक्तीचे नाव आहे. ब्रिजेश जिवंत असल्याचे समोर येताच आता पोलीस अंत्यसंस्कार केलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत.

मेहसाणा जिल्ह्यातील नरोडा येथील रहिवासी असलेला 43 वर्षीय ब्रिजेश 27 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसात ब्रिजेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी ब्रिजेशचा शोध सुरू केला.

शोध कार्यादरम्यान पोलिसांना 10 नोव्हेंबर रोजी साबरमती पुलाजवळ एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी ब्रिजेशच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र मृतदेहाची देहयष्टी ब्रिजेशशी जुळत असल्याने कुटुंबियांनी त्याचाच मृतदेह समजला. यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.

ब्रिजेशच्या मरणार्थ शुक्रवारी कुटुंबियांनी शोकसभेचे आयोजन केले होते. शोकसभा सुरू असतानाच ब्रिजेशची अचानक घरात एन्ट्री झाली आणि त्याला जिवंत पाहून कुटुंबियांसह नातेवाईक अवाक् झाले. कुटुंबियांनी पोलिसांना सदर बाब कळवली.

ब्रिजेशच्या परतण्याने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. मात्र, ब्रिजेशच्या कुटुंबाने कोणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले? याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, ब्रिजेश बेपत्ता होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अनुपमा’च्या सेटवर दुर्दैवी मृत्यू तरीही शूटिंग ठेवली सुरू; निर्मात्यांकडून 1 कोटीची मागणी ‘अनुपमा’च्या सेटवर दुर्दैवी मृत्यू तरीही शूटिंग ठेवली सुरू; निर्मात्यांकडून 1 कोटीची मागणी
स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी अचानक शो...
नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका व्हायरल; या दिवशी अडकणार लग्नबंधनात
Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, आनंद व्यक्त करत म्हणाली…
Dapoli News – राजकीय अनास्थेमुळे बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत
मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही! आदित्य ठाकरे यांची गर्जना
अजित पवार जातीयवादी, नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मृत समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले, शोकसभेत मुलगा जिवंत घरी परतला