अजित पवार जातीयवादी, नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

अजित पवार जातीयवादी, नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

अजित पवार हे जातीयवादी असून त्यांनी नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच त्यांनी या समाजासाठी निधी दिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आव्हाड यांच्या प्रचारासाठी रविवारी कन्हैयाकुमार येत आहेत, त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले.

ही विचारधारेची लढाई आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे द्वेष पसरवत आहेत, हा द्वेष देशाला धोकादायक आहे. याविरोधात लढणार एक फळी देशात आहे, त्यात कन्हैयाकुमार यांचे नाव आहे. तसेच ते माझे चळवळीतील सहकारी आहेत. त्यामुळे आपल्या प्रचारासाठी ते येत आहेत.विचारधारेविरोधातील आणि देशात द्वेष पसरवणाऱ्याविरोधातील लढाईसाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिभाताई पवार यांनाही आता प्रचारासाठी बाहेर पडावे लागत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यालाही आव्हाड यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्यावर ही वेळ कोणी आणली, याचा विचार अजित पवार यांनी करण्याची गरज आहे. अजित पवार यांनी जे केले, त्यामुळे शरद पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांची नाचक्की होईल, असं वर्तन त्यांनी का केलं? त्या माणसाला हृदय नाही का, भावभावना नाहीत काय? या घटनेने त्या माऊलीलाही वाईट वाटले असेल. ज्या माऊलीनं त्यांना लहानाचे मोठे केले, साहेबांकडे आग्रह धरून त्यांना अनेक गोष्टी मिळवून दिल्या. त्यांनी त्या माऊलीवरच ही वेळ आणली आहे, असा घणाघातही आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अनुपमा’च्या सेटवर दुर्दैवी मृत्यू तरीही शूटिंग ठेवली सुरू; निर्मात्यांकडून 1 कोटीची मागणी ‘अनुपमा’च्या सेटवर दुर्दैवी मृत्यू तरीही शूटिंग ठेवली सुरू; निर्मात्यांकडून 1 कोटीची मागणी
स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी अचानक शो...
नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका व्हायरल; या दिवशी अडकणार लग्नबंधनात
Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, आनंद व्यक्त करत म्हणाली…
Dapoli News – राजकीय अनास्थेमुळे बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत
मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही! आदित्य ठाकरे यांची गर्जना
अजित पवार जातीयवादी, नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मृत समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले, शोकसभेत मुलगा जिवंत घरी परतला