महाराष्ट्रातील गद्दारांना शिक्षा देण्याचं सर्व जनतेनं ठरवलंय! जयंत पाटील यांचा विश्वास
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. आमच्याकडे असलेल्या तपशीलानुसार हर्षवर्धन पाटील निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त आता समोरच्या उमेदवाराला किती मतांनी पाडायचे हे तुम्ही ठरवायचं, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील गद्दारांना शिक्षा देण्याचं सर्व जनतेनं ठरवलंय असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
याबाबत जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मराठी माणसाला कोणी फसवलेलं कदापी आवडत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गद्दारांना शिक्षा देण्याचे सर्व जनतेने ठरवले आहे.
पवार साहेबांनी त्यांना आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, सातत्याने प्राधान्य दिलं. तरी तुम्ही गेलात आणि वर आवाज करत आहात. पवार साहेबांना चॅलेंज करणं हे इंदापूरचे जनता कधीही मान्य करणार नाही. उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला मिळावं यासाठी सर्वे करण्याचे आदेश मी जलसंपदा मंत्री असताना दिले. त्याचे श्रेय इतर कोणी घेऊ नये. खडकवासला धरणातून निघणारा कालवा अंडरग्राऊंड करावा. त्यातून वाचणारे 2.5 टीएमसी पाणी इंदापूरकडे वळवावे अशी शाश्वत संकल्पना मी मांडली. पुढच्या दीड दोन वर्षात हे पाणी आपल्याकडे येईल, त्याचे उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटीलच करतील हे वचन देतो. आपले सरकार आल्यानंतर लोणी देवकर एमाआयडीसी मध्ये उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देऊ हा विश्वास देतो.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस संबोधित केले. आमच्याकडे असलेल्या तपशीलानुसार हर्षवर्धन पाटील निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त आता समोरच्या उमेदवाराला किती मतांनी पाडायचे हे तुम्ही… pic.twitter.com/GL7OBFuAlm
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 17, 2024
या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त आता समोरच्या उमेदवाराला किती मतांनी पाडायचे हे तुम्ही ठरवायचं, असेही जयंत पाटील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List