अभिनेता गोविंदाच्या छातीत दुखू लागले, रुग्णालयात केले दाखल
बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोविंदा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी जळगावमध्ये होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संपूर्ण माहिती मिळालेली नाही. गोविंदाच्या चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीबाबत चितेंचे वातावरण पसरले आहे. याआधी त्याला गोळी लागली होती. गोविंदाचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List