मिंध्यांना भाजपच्याच पखाली वाहव्या लागणार; संजय राऊत यांचा भीमटोला

मिंध्यांना भाजपच्याच पखाली वाहव्या लागणार; संजय राऊत यांचा भीमटोला

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राज्यावर बेकायदा मुख्यमंत्री लादले आहेत. ते भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांना आता भाजपच्याच पखाली वाहव्या लागणार आहेत, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना लगावला.

बेकायदा मुख्यमंत्री हे भाजपचेच आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांचे नेते आहेत. अनेक लहानलहान गोष्टींसाठी त्यांना दिल्लीला जावे लागते. त्यामुळे मिंधे यांना भाजपच्याच पखाली वाहव्या लागणार आहे. मिंधे प्रचाराची सुरूवात भाजपच्या उमेदवारापासून करत असल्याने मिंधे यांना भाजपच्या चपला उचलाव्या लागणार आहेत, ते भाजपचेच मिंधे असल्याने त्यांना भाजपच्या पखाली वाहव्या लागत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

हेलिकॉप्टरमधून एबी फॉर्म पाठवण्यात आले त्याची निवडणूक आय़ोग चौकशी करणार असल्याबाबत ते म्हणाले की, निवडणूक आय़ोगाच्या चौकशीला काहीही अर्थ नाही. आम्ही हेलकॉप्टरने पैसे पाठवल्याचे व्हिडीओ, पैसे वाटपाचे व्हिडीओ पाठवले. त्यांच्याकडे अनेक पुरावे दिले. मात्र, चौकशी किंवा काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणूक आय़ोगाकडून करण्यात येणाऱ्या चौकशीला काहीही अर्थ नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली. जनतेची सुरक्षा वाऱ्यावर असताना त्यांनी स्वतःसाठी फोर्स वनच्या पूर्ण पथकाचे संरक्षण घेतले आहे. राज्यात खून ,बलात्कार, खंडणी वसूली, कोयदा गँगची दहशत असे प्रकार घडत आहेत. असे प्रकार होत असताना गृहमंत्र्यांनी फोर्सवनची सुरक्षा घेतली. त्यांना नेमका कोणापासून धोका आहे. युक्रेन, इस्रायल, लिबिया, उत्तर कोरियाच्या किंम जोंगपासून धोका आहे, फडणवीसांना नेमका कोणापासून धोका आहे, ते आम्हाला समजायाला हवे. आम्ही देशाचे नागरिक आहोत. राज्याच्या गृहमंत्र्यांना नेमका कोणापासून धोका आहे, हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘शिवा’च्या प्रपोजलला अखेर आशू देणार उत्तर? मालिकेत मोठा ट्विस्ट ‘शिवा’च्या प्रपोजलला अखेर आशू देणार उत्तर? मालिकेत मोठा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवाने आशूला प्रपोज केल्याचं संपदा सर्वांना सांगते....
आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन, लष्कर-ए-तैयबाच्या सीईओच्या नावे फोन
मणिपुरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी… राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत मोदींना केले आवाहन
गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणी मोठा खुलासा, ISI कनेक्शन उघड
Manipur violence – मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासह मंत्री-आमदारांच्या घरांवर हल्ला
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला, हिजबुल्लाहने दोन रॉकेट डागले