मैत्रीपूर्ण लढतीत आम्ही पडणार नाही, प्रत्येक ठिकाणी एकास एक लढत होईल; संजय राऊत यांचा विश्वास

मैत्रीपूर्ण लढतीत आम्ही पडणार नाही, प्रत्येक ठिकाणी एकास एक लढत होईल; संजय राऊत यांचा विश्वास

महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीत पडणार नाही, प्रत्यक मतदारंसघात एकासएक लढत होईल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. याबाबत आज आणि उद्या दुपारपर्यंत चर्चा करत मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून संवाद साधण्यात येत आहे. उद्या दुपारपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक काळात करण्यात येणारी विधाने आणि सर्वच आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नसते. काही जागा मित्रपक्षांच्या विद्यामान आमदारांच्या जागा आहेत. त्या जागांवर वारंवार चर्चा होऊनही तडजोड होऊ शकली नाही. तसेच अनेक शिवसेना आमदारांच्या विद्यमान जागा आम्ही सोडू शकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी पक्ष कोणीही त्यांच्या विद्यमान जागा सोडायला तयार नसते. ही बाब सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे.

माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगत आहेत ती भिवंडीची जागा मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, समजावादी पक्षाचे विद्यमान आमदार तेथे आहेत. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले. मात्र, समाजवादी पक्षाने जागा सोडली नाही. अशावेळी आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय राहात नाही. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीत पडणार नाही, प्रत्येक जागेवर एकासएक लढत होईल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले..

राज्यात सात ते आठ ठिकाणी महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. असे प्रकार घडलेल्या ठिकाणी आज आणि उद्या दुपारपर्यंत चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले. असे प्रकार काहीठिकाणी गैरसमजातून घडलेले आहेत. तर काही ठिकाणी असे प्रकार का घडले, याचा शोध घेण्यात येत आहे. जुन्नर, चंद्रपूर, मुंबईतील एक दोन ठिकाणी अशा काही भागात शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काही ठिकाणी असे झाले आहे. याबाबत आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून संवाद करत आहोत. हे अपक्ष आणि काही ठिकाणी भरले गेलेले दोन अर्ज मागे घेतले जातील आणि एकास एक लढत होईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यात 288 जागा आहेत. त्यामुळे काही चुका होऊ शकतात. त्या दुरुस्त केल्या आहेत. आधी दिग्रजची जागा आम्ही लढवणार होतो. काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांच्यासाठी आम्ही ती जागा सोडली. दिग्रजऐवजी आम्ही दर्यापूरची जागा लढवत आहेत. असे काही बदल अनेक ठिकाणी करण्यात आलेले आहेत. शेकापशी अलिबाग, पेण, पनवेलबाबत आमची चर्चा झाली. सांगोल्याबाबती चर्चा होणार आहे. सांगोला ही आमची विद्यमान जागा आहे. आज आणि उद्यामध्ये हे सर्व विषय मार्गी लावण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dapoli News – राजकीय अनास्थेमुळे बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत Dapoli News – राजकीय अनास्थेमुळे बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत
स्वच्छ , स्वस्त आणि ताजी मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणून बुरोंडी बंदराची ख्याती आहे. मात्र ही ख्याती असलेले बुरोंडी बंदर राजकीय...
मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही! आदित्य ठाकरे यांची गर्जना
अजित पवार जातीयवादी, नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मृत समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले, शोकसभेत मुलगा जिवंत घरी परतला
आपण आपला महाराष्ट्र गुजरातच्या हाती द्यायचा का? पंकजा मुंडेंच्या व्हिडीओवरून शरद पवार यांच्या पक्षाचा सवाल
बाळासाहेब ठाकरे यांना राहुल गांधींची आदरांजली, ट्विट करून मोदींना दिलं प्रत्युत्तर
अभिनेता गोविंदाच्या छातीत दुखू लागले, रुग्णालयात केले दाखल