पक्षातल्या काही लोकांचा मला विरोध, बंडखोर गोपाळ शेट्टी उमेदवारीवर ठाम
माजी खासदार भाजपचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. माझा भाजपला विरोध नाही, पण पक्षात काही लोक माझ्या विरोधात आहेत आणि माझा लढा त्या लोकांविरोधातच आहे असे स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी दिले आहे.
मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून गोपाळ शेट्टी भाजपच्या तिकीटावर दोनदा खासदार झाले होते. 2024 साली भाजपने त्यांचे तिकीट कापले आणि त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना तिकीट दिले. आता विधानसभा निवडणुकीतली बोरीवली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे शेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी शेट्टी यांची भेट घेतली होती. मी भाजप सोडणार नाही अशी ग्वाही शेट्टी यांनी दिली होती.
मी भाजपा कधीच सोडणार नाही. पक्षाचे नुकसान होईल असे काही करणार नाही, अशी ग्वाही गोपालजी शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि शिवप्रकाशजी यांच्या भेटीनंतर दिली आहे.@Dev_Fadnavis @shivprakashbjp@iGopalShetty @ShelarAshish pic.twitter.com/8EwQZVM5od
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 2, 2024
माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, कमळ माझ्या हृदयात आहे, उद्या पक्षाने जरी मला निलंबीत केले तरी मी पक्ष सोडणार नाही. पण पक्षानेही काही शिस्त पाळली पाहिजे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
मी निवडणूक लढवण्यावर ठाम असे असे शेट्टी म्हणाले. तसेच मी माझ्या पक्षाच्या विरोधात नाही. मी कधीच पक्ष सोडणार नाही, पक्षातले काही लोक माझ्या विरोधात आहेत. माझा लढा या लोकांविरोधात आहे असेही शेट्टी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List