MS Dhoni – फसवणूक प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाची धोनीला नोटीस
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंडच्या उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. 15 कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी न्यायालयाने धोनीला त्याची बाजू मांडण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. महेंद्रसिंग धोनीने अर्जदाराविरुद्ध रांची दिवाणी न्यायालयात 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनीही धोनीच्या याच तक्रारीविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ज्यावर 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली.
न्यायमूर्ती संजय कुमार द्विवेदी यांच्या न्यायालयाने मंगळवारी अर्जदार मिहिर दिवाकरच्या याचिकेवर सुनावणी करताना धोनीला नोटीस बजावली आणि त्याची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. जानेवारीमध्ये महेंद्र सिग धोनीने या प्रकरणात त्याचे व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर, सौम्या दास यांच्याविरोधात फसवणुकीचे तक्रार केली होती. दोघांनीही त्याच्या नावाचा चुकीचा वापर करुन 15 कोटींची फसवणुक केल्याचे त्यात म्हटले होते.
या संपूर्ण प्रकरणात मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी रांचीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली होती.याच प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता नोटीस मिळाल्यानंतर धोनी किती दिवसांनी आपली बाजू मांडणार हे पाहायचे आहे. कारण त्याला कोणत्या तारखेपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List