महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपायुतीचा दावा फसवा व खोटा; प्रगती महाराष्ट्राची नाही तर युतीतील धोकेबाजांची!

महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपायुतीचा दावा फसवा व खोटा; प्रगती महाराष्ट्राची नाही तर युतीतील धोकेबाजांची!

महायुती सरकारने दोन वर्षांचे प्रगती पुस्तक जाहीर केले पण या सरकारने महाराष्ट्राची प्रगती केलेली नाही तर केवळ युती सरकारमधील धोकेबाजांची प्रगती झालेली आहे आणि महाराष्ट्राची दुर्गती केली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, भाजपा युती सरकारच्या काळात महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, दोन वर्षात महिला अत्याचारांच्या 67 हजार 381 प्रकरणांची नोंद झालेली आहे, दर तासाला महिला अत्याचाराच्या 5 तक्रारींची नोंद झालेली आहे. राज्यातील 64 हजार मुली, महिला बेपत्ता आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपुरातून 13 हजार मुली महिला बेपत्ता आहेत.

महिलांप्रमाणे शेतकरीही दर्लक्षित राहिला, या सरकारच्या काळात 20 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत ही चिंतेची बाब आहे. एक रुपयात विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

भाजपा युती सरकारच्या काळात विमा कंपन्यांना 4 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून रुग्णवाहिकांच्या खरेदीत 8 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. आरोग्य विभागात तब्बल 20 हजार पदे रिक्त आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

शिक्षण क्षेत्रातही अनागोंदी कारभार असून 44 लाख मुलांना अजून गणवेशही मिळालेले नाहीत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 14 हजार शाळा बंद करुन गरिब व मध्यमवर्गियांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तक शाळा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा अदानीला देण्यात आली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

राज्यामध्ये बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं! – संजय राऊत

देवेंद्र फडणवीस कितीही दावा करत असले तरी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातने पळवला. महाराष्ट्रातील 9 लाख कोटींचे प्रकल्प व 10 लाख नोकऱ्या भाजपा युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; बंडोबांची व्यवस्था केलीय, चेन्नीथला यांची माहिती

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य...
… संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू – राहुल गांधी
… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल
एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
महाराष्ट्र सरकार शेतकरीविरोधी, भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा! नाना पटोले
Video – चिमुकल्याच्या घोषणांनी उद्धव ठाकरे भारावले; जाहीर सभेत सत्कार
मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला