रशियात पहिल्या मुलाच्या जन्मासाठी 9 लाख रुपये
रशियातील खाबरोव्स्क प्रांतात 18 ते 23 वयोगटातील महिलांना मुलाच्या जन्मावर 1 लाख रुपये दिले जाणार आहेत, तर चेल्याबिन्स्कमध्ये महिलांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी 9 लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय देशात लोकांना मुले होऊ नयेत यासाठी प्रोत्साहन देण्यावर बंदी असेल. रशियन सरकार नवा कायदा आणणार आहे. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा कोणताही कंटेट चालवला जाणार नाही, जो लोकांना मुले होण्यापासून प्रतिबंधित करतो. रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह स्टेट डयूमाने 12 नोव्हेंबर रोजी यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला असून आता ते 20 नोव्हेंबरला वरिष्ठ सभागृहात मांडले जाणार आहे. येथून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी व्लादिमीर पुतिन यांच्याकडे पाठवला जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर हा कायदा लागू होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List