काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत दारून पराभव झाल्यामुळे टीम इंडिया आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे टीका कारांच्या तोंडावर पट्टी लावण्याची नामी संधी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. त्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कंबर कसली असून खेळाडूंच्या सरावासाठी अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 22 नोव्हेंबर पासून पहिला कसोटी सामना सुरू होईल. त्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी मंगळवार (12 नोव्हेंबर 2024) पासून सरावाला सुरुवात केली आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विनसह सर्वच खेळाडूंना नेटमध्ये घाम गाळला. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंचा हा सराव काळ्या कपड्याच्या आड पार पडला. म्हणजेच खेळाडूंच्या सरावासाठी उभारण्यात आलेल्या नेट्स काळ्या कपड्याने पूर्णपणे झाकल्या होत्या. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या या सराव सत्राच्या हटके पद्धतीची सध्या स्थानिक मीडियामध्ये चर्चा रंगत आहे.
गौतम गंभीर यांच्यासाठी प्रशिक्षक म्हणून ही मालिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सराव सत्र गुप्त ठेवून ऑस्ट्रेलियाला धुळ चारण्यासाठी त्याने अनोख्या पद्धतीचा अवलंब केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सराव सुरू असताना स्टाफमधील कोणालाच मोबाईल वापरण्याची परवानगी नाही. यावेळी त्यांच्यासमवेत सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मोर्केल सुद्धा उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List