गिरणी कामगारांकडून पैसे उकळणाऱ्या चढ्ढा बिल्डरला दणका, म्हाडाने धाडली ‘कारणे दाखवा’ नोटीस
तुम्हाला वांगणीला घर लागलेय. पाच हजार रुपये आणि संमती पत्र भरा, अशा आशयाचे पह्न करून म्हाडाच्या नावाखाली गिरणी कामगारांना लुटणाऱ्या चढ्ढा बिल्डरला अखेर म्हाडाने ‘कारणे दाखवा’ नोटीस धाडली आहे. चढ्ढा बिल्डरकडून यासंदर्भात स्पष्टीकरण आल्यानंतर म्हाडाकडून पुढील कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे.
गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मुंबई महानगर प्रदेशात 81 हजार घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने दोन खासगी विकासकांबरोबर करार केला आहे. गिरणी कामगारांची संमती घ्यावी असे त्यात नमूद आहे. सरकारकडून स्पष्टता आल्यानंतर संमती घेणे बिल्डरकडून अपेक्षित होते. मात्र चढ्ढा बिल्डरने परस्पर गिरणी कामगारांसोबत संपर्क साधून त्यांच्याकडून संमती पत्र आणि पाच हजार रुपये घेण्यास सुरुवात केली. तसेच म्हाडाला अंधारात ठेवून त्यांच्या परवानगीशिवाय म्हाडाचे नाव आणि लोगोदेखील वापरले. यासंदर्भात गिरणी कामगारांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर संयुक्त मराठी मुंबई चळवळ या संघटनेने म्हाडा तसेच चढ्ढा बिल्डरच्या कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर म्हाडाने चढ्ढाला नोटीस धाडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List