भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची महिलांबद्दलची भूमिका कायम अन्याय करणारी राहिली आहे. महिला अत्याचारांबाबत मणिपूर ते मुंबई असा आताचा भाजपचा प्रवास आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीशी कायम भाजप उभा राहतो हे उघड सत्य आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत पुरोगामी महाराष्ट्रातील महिला भाजप आणि त्यांचा साथीदार मित्रपक्ष शिंदे सरकारला धडा शिकवतील, असे उत्तर प्रदेश विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा-मोना यांनी म्हटलेय.
मुंबईतील राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा नारा पोकळ घोषणा असून महिलांबद्दल भाजपचे चाल, चरित्र व चेहरा काय आहे ते सर्वांना माहीत आहे. हाथरस असो वा महिला खेळाडू, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या मागे भाजपचे पाठबळ राहिले आहे. मुंबई शहरात महिला अत्याचारांच्या 2022 मध्ये 6176 गुह्यांची नोंद झाली असून महिलांसाठी सुरक्षित मानली जाणाऱया मुंबईतही महिला सुरक्षित नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपच्या कथनी आणि करणीत फरक
आदिवासी महिलेला राष्ट्रपती केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत, पण त्याच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाला बोलावले नाही. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनालाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही, हा फक्त राष्ट्रपती महोदयांचाच नाही तर समस्त महिलांचा अपमान आहे. याउलट, काँग्रेसने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List