खोके सरकारची पोलखोल; आदिवासींवर पोलिसांची जुलूमशाही

खोके सरकारची पोलखोल; आदिवासींवर पोलिसांची जुलूमशाही

मध्य वैतरणा धरणाचे काम करताना परिसरातील पाच वाड्यांवरील आदिवासींच्या जमिनी बाधित झाल्या. मात्र तेरा वर्षे संघर्ष करूनही प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची फुटकी कवडी दिली गेली नाही. यावरून भूमिपुत्रांनी खोके सरकारविरोधात संताप व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ऐन निवडणुकीत ही पोलखोल केल्याने तिळपापड झालेल्या मिंध्यांनी पोलिसांच्या आडून मोखाड्यातील आदिवासींना धमक्या देण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मतदानावर बहिष्कार टाकाल तर खबरदार, असा गर्भित इशाराच पोलीस घरोघरी आदिवासींना देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खोके सरकारच्या या मोघलाई कारभाराविरोधात संताप व्यक्त होत असून विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनता यांना धडा शिकवेल, असा इशाराच प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

मध्य वैतरणा धरण जलद गतीने बांधून सरकारने मुंबई आणि उपनगरांची तहान भागवली आहे. मात्र या धरणातील पाण्याखाली मोखाड्यातील कारेगाव, कोचाळे, कडुचीवाडी, करोळ आणि पाचघर येथील २५ आदिवासी कुटुंबांची शेकडो एकर शेतजमीन गेली आहे. ही सर्व कुटुंबे एकसाली प्लॉट धारक शेतकरी आहेत. त्यांची शेतजमीन पाण्याखाली गेल्याने या कुटुंबांचे उपजीविकेचे साधन हिरावले असून जमिनीचा मोबदला न दिल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त आदिवासी कुटुंबे सन 2013 पासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी धरणाच्या प्रवेशद्वारावर अनेकदा आंदोलन केले आहे. जमीन पाण्याखाली गेल्याने ही प्रकल्प ग्रस्त आदिवासी कुटुंबे गेल्या 13 वर्षांपासून उपासमारीत जगत आहेत. त्यामुळे या पाच गावातील प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या पाचही गावांत निवडणूक अधिकाऱ्यांना फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून पोलिसांच्या आडून आदिवासींना धमक्या दिल्या जात आहेत.

तर जेलमध्ये जाऊ

जमीन पाण्याखाली गेल्यानंतर आम्हाला दोन वर्षांची बुडीत मजुरीपोटी दोन लाखांची कवडीमोल मदत मिळाली आहे. मात्र जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. अनेकदा आंदोलन आणि पत्रव्यवहार करूनही मोबदला मिळाला नाही. म्हणून या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दरम्यान असे कृत्य केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी मला 4 नोव्हेंबरला घरी येऊन दिली आहे. मात्र आपण जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी रामा काळू कडू यांनी सांगितले आहे.

निवडणुकीच्या काळात सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या असतील त्यावर निवडणुकीनंतर तोडगा काढला जाईल. ऐन निवडणुकीत असे कृत्य करणे योग्य नाही.
■ मयुर खेंगले, तहसीलदार मोखाडा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त