मुंबई विमानतळावर पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी, CISF कंट्रोल रुमला अज्ञात व्यक्तीचा कॉल
मुंबई विमानतळाला येणाऱ्या धमक्यांचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. बुधवारी दुपारी पुन्हा एकदा मुंबई विमानतळाला उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने CISF कंट्रोल रुमला कॉल करून ही धमकी दिली. गेले काही दिवस विमाने उडवण्याची धमकीचे सत्र सुरू आहे. सर्व धमक्या खोट्या ठरल्या असल्या तरी प्रत्येक वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
CISF कंट्रोल रुमला कॉल केलेल्या व्यक्तीने मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत तो स्फोटकं घेऊन मुंबईहून अझरबैजानला जात असल्याचे सांगितले. यानंतर CISF ने तात्काळ सहार पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली. अझरबैजान येथे सध्या UN शिखर परिषद सुरू आहे.
दरम्यान, या धमकीबाबत मुंबई विमानतळ प्राधिकरण किंवा ऑपरेटर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या महिन्यात, इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाईसजेटसह प्रमुख विमान कंपन्यांनाही असे धमकीचे खोटे कॉल आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List