डॉक्टरांचा हलगर्जीपणा! 7 वर्षाच्या मुलाला डाव्या डोळ्याला होता त्रास, उजव्या डोळ्यावर केली शस्त्रक्रिया
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला असून त्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका 7 वर्षाच्या मुलाच्या डाव्या डोळ्याला त्रास होता, मात्र डॉक्टरांनी त्याच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवाय या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबाकडून 45 हजार रुपये घेतले. शस्त्रक्रियेनंतर मुलगा घरी परतल्यानंतर घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि नंतर एकच गोंधळ उडाला.
याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या सीएमओला तक्रार केली. घरच्यांनी सांगितले की, मुलाच्या डाव्या डोळ्याला त्रास होता. त्याला डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यासाठी रुग्णालयात 45 हजार रुपये जमा करायला सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या डाव्या सोडून उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर ज्यावेळी डॉक्टरांनी त्याला घरी पाठवले त्यावेळी कुटुंबियांच्या लक्षात आले की मुलाच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया न करता उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात जाऊन याचा जाब विचारला. त्यावर सीएमओ ऑफिसला पोहोचून प्रबंधक आणि डॉक्टराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना ग्रेटर नोएडाच्या बीटा 2 परिसरातील सेक्टर गामा 1 येथील आनंद स्पेक्ट्रम रुग्णालयाची आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि याप्रकरणाचा तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List