महाडमधील बौद्ध समाज गोगावलेंविरुद्ध एकवटला, शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांनाच मतदान करण्याचा निर्धार

महाडमधील बौद्ध समाज गोगावलेंविरुद्ध एकवटला, शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांनाच मतदान करण्याचा निर्धार

मिंध्यांचे महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भरत गोगावले यांच्याविरोधात स्थानिक बौद्ध समाज एकवटला आहे. वारंवार संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना कदापिही आम्ही थारा देणार नाही. शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांनाच मतदान करण्याचा निर्धारदेखील करण्यात आला.

बौद्ध समाजाच्या वतीने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना पदाधिकारी विश्वनाथ सोनवणे तसेच त्यांचे सहकारी राहुल साळवी यांनी सांगितले की, महाड तालुक्यात भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी एक मेळावा आयोजित केला होता. मात्र हा मेळावा बौद्ध समाजाचा नसून काही मोजक्याच लोकांनी तो भरवला होता. पण आमचा पाठिंबा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महाडच्या भूमीने नेहमीच क्रांतिकारी बदल केला असून त्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. समतेचा विचार मांडणाऱ्यांनाच आम्ही पाठिंबा देत असल्याचे राहुल साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाड तालुक्यातील तरुणांना उत्तम शिक्षण, रोजगार मिळणे आवश्यक आहे. मात्र गेल्या 15 वर्षांत हा विकास का झाला नाही, असा सवाल करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा न करता बौद्ध समाजातील तरुणांनी आपली सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी अनिल जाधव, संजय सोनवणे, सखाराम सकपाळ, तुळशीराम जाधव, प्रकाश मोहिते, भीमराव धोत्रे, अरुणा आजगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त