श्रीनिवास वनगा अखेर 36 तासांनी परतले; अजूनही डिप्रेशनमध्ये, पुन्हा घराबाहेर निघून गेले!
विधानसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघातून शिंदे गटाने उमेदवारी नाकारत विश्वासघात केल्याने श्रीनिवास वनगा यांना मोठा धक्का बसला. त्यांना माध्यमांसमोरच रडू कोसळले. उमेदवारी न मिळाल्याने धक्का बसल्याने श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. अखेर 36 तासांनी त्यांनी कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधला. आणि रात्री घरी परतले.
उमेदवारी न मिळाल्याने ऐन धामधुमीत श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले होते. श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे त्यांच्या पत्नीने म्हटले होते. त्यामुळे वनगा यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर मंगळवारी रात्री उशीरा श्रीनिवास वनगा घरी आल्याचे सांगितले जाते. श्रीनिवास वनगा हे रात्री दोन ते तीनच्या सुमारास घरी आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांची ही संपर्क साधल्याचे सांगण्यात येते.
घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा हे रात्री त्यांच्या मित्रांसोबत गेले. ते आता व्यवस्थित आहेत. सोमवारी संध्याकाळपासून ते आपल्या एका मित्राच्या घरी होते. ते सध्या प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. शांत झाल्यावर ते घरी आले. आमच्याशी बोलून ते पुन्हा घराबाहेर पडले, असे श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने सांगितले. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे. पण घरी परतल्यानंतर वनगा पुन्हा कुठे गेले, याबद्दल कुटुंबीयांनी कोणतीही माहिती दिली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List