गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली

गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली

मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या गुंडांना शिवसैनिकांनी जनतेला पैसे वाटण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या बांगर यांच्या गुंडांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी गेलेल्या एका क्रुझर गाडीच्या काचा फोडल्या. त्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी गाडी गेली होती. त्या गाडीवर संतोष बांगर यांच्या गुंडांनी दगडफेक केली. या दगडफेकीत क्रूझर गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कळमुरी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिवसेना उमेदवार माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, शिवसेनेचे माजी खासदार ॲड.‌ शिवाजी माने, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, जिल्हा संघटक बालासाहेब मगर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य...
… संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू – राहुल गांधी
… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल
एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
महाराष्ट्र सरकार शेतकरीविरोधी, भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा! नाना पटोले
Video – चिमुकल्याच्या घोषणांनी उद्धव ठाकरे भारावले; जाहीर सभेत सत्कार
मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला